*सामाजिक कार्यकर्ते संतोष बोम्मावार यांनी संवर्ग विकास अधिकारी राहुल वरटे यांचा मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
ग्रामपंचायत कमलापुर
येथील ग्रामस्ताना गावातील पिण्याच्या पाण्याला नळाला पाणी येत नसल्यामुळे
सामाजिक कार्यकर्ते संतोष बोम्मावार (ग्रामसभा सदस्य कमलापुर यांनी
महोदय वरील विषयास अनुसरुन आपनास नम्रपणे सांगू इच्छितो कि,साधारण गेल्या २वर्षापासुन प्रत्येक वार्डातील ग्रामपंचायतच्या पिण्याच्या पाण्याचा नळाला पाणी येत नसून मागील वर्षात पाण्याचा पाईपलाईन दुरुस्तीचे काम केले होते. परंतू आजही समस्या तीच आहे. शासन हर घर नळ योजना राबवत असताना देखील अजूनहि पाण्याची समस्या सुटत नसेल तर हा विषय फारच गंभीर आहे. कारण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपे पर्यंत प्रत्येकाला पाण्याची आवश्यकता भासत असते, त्यामुळे गावातील नागरिक, शेतकरी, महीला,किशोर वयीन मुलींना, तसेच इतर स्री पुरुषांना खुप दूर जाऊन पाणी आणावे लागत असते त्यामुळे त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असतो. शासन प्रत्येक घरी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून लाखो रुपये खर्च करतो आहे तरीही लाखो रुपये पाण्यात गेल्या सारखे वाटत आहे.प्रत्येकाच्या घरी पाणी उपलब्ध होत नसेल तर गावातील लोकांसाठी चिंताजनक आहे.वरील पाण्याची समस्या लोकांनासाठी खूप गरजेचे आहे व गावातील प्रत्येक वार्डातील पाण्याची व्यवस्था लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष बोम्मावार यांनी निवेदनातून केली आहे.
प्रतीलीपी
१) मा,जिल्हा अधिकारी साहेब जिल्हा कार्यालय गडचिरोली
२)मा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली
३) मा,गट विकास अधिकारी पंचायत समिती अहेरी.

