सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694
बल्लारपुर: बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील सर्वात मोठे गाव असलेल्या बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावात प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू असताना अचानक रविवार (दि.17) दुपारी 4 वाजता महाविकास आघाडीचे प्रचार कार्यालय मुदती पूर्व बंद करून मंडप काढण्यात आल्याने ही घर मालकाची किंवा त्यावर कोन्ही दडपण आणून ते काढण्यास भाग पाडत असलेच्या चर्चेला उधाण आले; असून गावात पहिल्यांदाच प्रचारा दरम्यान मुदतीपूर्व एखादे कार्यालय बंद करण्याचा अजब प्रकार घडला आहे. यामुळे ही दडपशाही की; महाविकास आघाडीची सहानुभूती मिळविण्याचा फंडातर नसावा अशी उलट सुलट चर्चा गावात सुरू आहे. मात्र या प्रकाराने गावात महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांन मध्ये रोष निर्माण झाला हे घटना स्थळावर मंडप काढताना दिसून आले आहे.
विसापूर गावात एक (शनिवार) दिवसापूर्वी महाविकास आघाडीचे उमेदवार यांची प्रचार सभा झाली होती व दुसऱ्या दिवशी अचानक घनश्याम गौरकार यांच्या जाग्यावर उभारण्यात आलेले प्रचार कार्यालय रविवार दुपारी 4 वाजता काढण्यात आले व ज्यांच्या जाग्यावर हे कार्यालय होते त्यांचे मोठे बंधू वामन गौरकर हे काँग्रेस पार्टीचे विसापूर शाखेचे अध्यक्ष आहे. त्यांना या बाबत विचारले असता त्यांनी याबाबत कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. परंतु कार्यालय काढत असताना त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. त्यामुळे ते कोणाच्या तरी दडपणात तर नसावे किंवा त्यांच्या भावाचे त्यांनी या बाबत परवानगी घेतली नसावी अशी चर्चा होत आहे. परंतु या बाबत विसापूर येथे महाविकास आघाडीच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे माजी सरपंच बंडू गिरडकर यांना विचारणा केले असता रीतसर परवानगी घेवून प्रचार कार्यालय उघडल्याची माहिती त्यांनी दिली. परंतु मुदती पूर्वी कार्यालय बंद करण्याची नामुष्की पहिल्यांदाच महाविकास आघाडीला गावात आली असून हे अज्ञात शक्ती द्वारा दडपणाचे तर राजकारण तर नाही ना; या बाबत गावात उलट सुलट चर्चा सुरू आहे
विसापूर गावातील महाविकास आघाडीचे कार्यालय निवडणूक आयोगाच्या रीतसर सर्व परवानग्या घेवून उघडण्यात आले आहे. परंतु घरमालक यांनी अचानक कार्यालय बंद करण्यास सांगितले त्यामुळे त्यांच्यावर विरोधी पक्षाने किंवा त्यांच्या हितचिंतकाने दबाव आणला आसवा असे वाटत आहे.:-बंडू गिरडकर, मुख्य प्रचारक, महाविकास आघाडी, विसापूर

