मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- विधानसभा मतदार संघात आज सकाळ पासून मतदान मोजणीला सुरुवात झाली आहे. पाचव्या फेरी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना 13210 मते मिळाली असून दुसऱ्या क्रमांकावर भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजे अंबरीश राव आत्राम यांना 10217 मते मिळाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस श.प पक्षाच्या उमेदवार भाग्यश्री धर्मरावबाबा आत्राम यांना 6890 मते मिळाली आहे. अपक्ष उमेदवार हमंतू मडावी यांना 6336 मते मिळाली आहे. पाचव्या फेरी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम 2993 मताने आघाडीवर आहे.

