} सौ.हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694 बल्लारपूर :
सविस्तर वृत्त असे आहे की वाराबुकी पक्ष्यांची शिकार करून विकणाऱ्या शिकाराल्याला बल्लारशाह वनपरिक्षेत्र चे अधिकारी आणि कर्मचाऱ्याने सापडा रचून अटक केले. स्थानीक वाराबुकी हा पक्षी ४० मैल प्रती तास वेगाने उडणारा पक्षी म्हणुन त्याची ओळख असुन निसर्ग चक्रातील हा पक्षी महत्वाचा घटक आहे.
सदर पक्षीची अवैधरित्या शिकार करुन त्याची विक्री करीत असल्याचे गुप्त माहितीच्या आधारे दिनांक २५ नोव्हेंबर ला रात्री ७.०० वाजताचे सुमारास विसापुर टोल नाका परिसरात सापडा रचुन आरोपी संजय दादा नाने, (३३) रा. विसापुर याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याचा जवळ मृत अवस्थेत असलेले वाराबुकी पक्षी मोक्यावर आढळुन आले.त्यांनतर आरोपीचे घरी जावुन अधिक झडती घेतली असता घरी सुध्दा जिवंत असलेले वाराबुकी पक्षी व गुन्हयात वापरलेले साहित्य आढळुन आले. आरोपीची अधिक चौकशी केली असता वर्धा नदीपात्रातुन वर नमुद पक्षी जाळीच्या सहाय्याने पकडुन त्यांची विक्री करीत असल्याचे अरोपीने कबुली दिली.
आरोपी विरुध्द वन्यप्राणी (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम २,९,३९,४४,४९ (ब ), ५०,५१ अन्वये वनगुन्हा क्र. ०८९४४/२२३५९९ २५ नोव्हेंबर २०२४ जारी करण्यात आला असुन वनगुन्हात वापरण्यात आलेले १ मोटार सायकल व आरोपीच्या घरुन गुन्हयात वापरण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले.
सदर कार्यवाही सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी बल्हारशाह नरेश रामचंद्र भोवरे व डब्लुपीएसआय चे प्रतिनिधी मुकेश भांदकर, यांचे उपस्थितीत क्षेत्र सहाय्यक कोमल घुगलोत वनरक्षक वर्षा पिपरे, सुधीर.एम. बोकडे, अनिल बी. चौधरी व सरंक्षण मजुर नितेश बावणे यांनी आरोपीला पकडण्यात सहकार्य केले.सदर प्रकरणाचा पुढील तपास मध्य चांदा वनविभाग चंद्रपुर चे उपवनसंरक्षक, स्वेता बोड्डु व सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह नरेश रामचंद्र भोवरे हे करीत आहेत.
वाराबुकी पक्षी ची नदीपात्रात किंवा तलाव परिसरात शिकार होत असल्याचे माहिती मिळाल्यास तात्काळ वनविभागाला कळवावे. शिकाऱ्या विरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे आवाहन नरेश भोवरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह भ्रमणध्वनी क्रं. ८६६८२५९२१७ हे करीत आहे.

