अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाइन सावनेर:- आज मुंबई येथील आझाद मैदानावर राज्याच्या नवीन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेन्द्र मोदी सह अनेक केंद्रीय मंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री, खासदार, आमदार, चित्रपट अभिनेते सह हजारो नागरिक उपस्थित होते.
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सुद्धा शपथ घेतली.
सावनेर येथे जल्लोष : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सावनेर येथे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी करित सावनेर येथील गांधी चौकात गुलाल उधळीत जल्लोष केला. यावेळी उपस्थितांमध्ये रामराव मोवाडे, मनोहर कुंभारे, राजु घुगल, तुषार उमाटे, मंदार मंगळे, सामाजिक कार्यकर्ते राजूभाऊ कांबे, प्रमोद ढोले, रवींद्र ठाकुर, नरेंद्र ठाकूर, सतीश बनकर व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

