Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

संविधानाची विटंबना करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा: तथागत ग्रुप संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांची मागणी

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 16, 2024
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
संविधानाची विटंबना करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा: तथागत ग्रुप संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांची मागणी
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मेहकर:- परभणी येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील भारतीय संविधान शिल्पाची तोडफोड करुन देशद्रोही कृत्य करणाऱ्या दत्ता सोपान पवार या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीचे निवेदन तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांच्या नेतृत्वाखाली व शिष्टमंडळाने मेहकर पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.

१० डिसेंबर रोजी परभणी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी भारतीय संविधान शिल्पाची विटंबना दत्ता सोपान पवार या माथेफिरू इसमाने केल्याची घटना घडली आहे. स्वतंत्र भारतातील व्यक्तींचे सार्वभौमत्व हक्क देणारे भारतीय संविधान हे सर्वोच्च ग्रंथ आहे. भारतीय संविधानाची विटंबना करणे म्हणजे लोकशाही नाकारणारे कृती आहे. या देशामध्ये व राज्यांमध्ये विशिष्ट धर्माचे राष्ट्र होण्याची मनसुबे रचले जात आहेत. संविधानाची विटंबना करणे हा त्यातीलच एक भाग आहे. संविधानाची विटंबना करणाऱ्या या माथेफिरूला देशद्रोहाच्या अंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ शिक्षा करावी.

परभणी येथे संविधानाच्या विटंबनेनंतर लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंबेडकरी समुदायावर गुन्हे दाखल करू नये. अन्यथा तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात येत आहे.
यावेळी, मेहकर ठाणेदार साहेब यांनी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या शिष्टमंडळाचे निवेदन स्विकारून आपल्या मागण्या शासनाला कळविल्या जातील असे सांगितले.

यावेळी, तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई, रवि मिस्कीन कुणाल माने, अख्तर कुरेशी, प्रकाश सुखधाने, नारायण इंगळे,समीर भाई शहा, राधेश्याम खरात, देवानंद आवसरमोल, दिपक गवई, शेख.राजुभाई, शाम कटारे यांच्यासह मेहकर तालुक्यातील समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमेहकरसंविधानाची विटंबना करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा: तथागत ग्रुप संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांची मागणी
Previous Post

हिंगणघाट येथील 160 च्या वर भाजपा पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, आमदार कुणावार यांना मंत्रिपद दिले नसल्याने नाराजी.

Next Post

भारत विद्यालय वेळा येथे अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
भारत विद्यालय वेळा येथे अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन.

भारत विद्यालय वेळा येथे अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In