मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- आज राज्यातील अनेक प्रशासकीय अधिकारी यांच्या बदल्या झाल्या आहे. त्यात वर्धा जिल्हाचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी राज्यकर मुंबईच्या सहआयुक्त वान्मथी सी.यांची वर्धेच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे मसूरी येथे प्रशिक्षणासाठी गेले आणि परत येण्यापूर्वीच त्यांची नाशिक महानगर पालिकेच्या आयुक्त म्हणून बदली करण्यात आलेली आहे. त्यांच्या जागी राज्य कर सहआयुक्त मुंबई येथील वान्मथी सी. वर्धेच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. कर्डिले यांना विभागीय आयुक्त यांच्या सूचनेनुसार, पदभार देऊन त्वरित नाशिक येथे रुजू होण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

