Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

चंद्रपूर: काँग्रेसकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा: गृहमंत्री अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी करीत निषेध.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 25, 2024
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
चंद्रपूर: काँग्रेसकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा: गृहमंत्री अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी करीत निषेध.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती यांना देण्यात आले विविध मागण्याचे निवेदन.

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- भारतीय राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भारतीय संसदेत विशेष चर्चा सुरू असताना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी भर संसदेत आक्षेपार्ह विधान करून त्यांचा घोर अपमान केला असून देशातील जनमानसाच्या भावना दुखावल्या आहेत. याबद्दल गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत जाहीर माफी मागावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा स्वतःहून द्यावा तसेच देशातील आणि महाराष्ट्र राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असल्याने तात्काळ प्रभावाने आपल्या स्तरावरुन आवश्यक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करीत चंद्रपूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने चंद्रपूर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा काढण्यात आला. यावेळी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गृहमंत्री शाह यांच्या त्या वक्तव्याचा जोरदार निषेध व्यक्त करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांना निवेदन देण्यात आले.

केंद्र व राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळे देशात व राज्यात वाढता गुंडाराज, महिलांवरील अत्याचार, भाजपच्या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांकडून काँग्रेस कार्यालयावर हल्ला, परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान, परभणीतील वडार समाजातील भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलीस कोठडीतील संशयास्पद मृत्यू, बिड जिल्हातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या, कल्याणमध्ये मराठी माणसावर गुंड पाठवून हल्ला या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी

राज्यात कायदा सुव्यवस्था पुर्णपणे बिघडलेली आहे. हे सरकार मंत्रिमंडळातील नेत्यांचा, पोलिसांचा बचाव करीत जनतेवर अन्याय करीत आहेत. देशातील जनतेने वारंवार मागणी करूनही जातीय जनगणना करण्यास व इव्हिएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूका घेण्यास भाजप प्रणित सरकार टाळाटाळ करीत आहे. राज्यात सोयाबीन, कापूस, धान उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. खोट्या योजना व खोट्या आश्वासनाने सत्तेत आलेले हे सरकार जनतेवर होणारा अन्याय दूर करण्यात पुर्णपणे अयशस्वी ठरले आहे. त्यामुळे कायद्याच्या या राज्यात संविधानाची उघड उघड पायमल्ली करून, गुंडाराज, अराजकता निर्माण होत असतांना केंद्र आणि राज्य सरकार मुग गिळून गप्प आहे. हे सरकार सर्व सामान्य जनतेला संरक्षण देण्यात अयशस्वी ठरले आहे. त्यामुळे देशाच्या महामहिम राष्ट्रपती यांनी वरील सर्व बाबी लक्षात घेऊन तात्काळ प्रभावाने आवश्यक कार्यवाही करावी अशी मागणी जिल्हा काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी मोर्चाचे नेतृत्व खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दिपक जैस्वाल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रा. रमेशचंद्र दहिवडे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, सुभाषसिंग गौर, विनोद दत्तात्रय, अनिरुद्ध वनकर, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, घनश्याम मुलचंदाणी, प्रवीण पडवेकर, नंदु नागरकर, चंदाताई वैरागडे, महिला अध्यक्षा सुनंदा ढोबे, संगीता अमृतकर, अश्विनी खोब्रागडे, बेबीताई उइके, प्रशांत भारती, अरूण भेलके, करिमभाई, सोयल रजा शेख, प्रशांत दानव, संतोष लहामगे, प्रमोद बोरीकर, गोपाल अमृतकर, राजेश अडुर, इस्माईल शेख, अंकित रामटेके, अजय महाडोळे, रामकृष्ण कोंद्रा, मनिष तिवारी, वसंता देशमुख, शालिनी भगत, सुनीता अग्रवाल, सिमा वाघमारे, यासह जिल्ह्यातील काँग्रेस तथा महाविकास आघाडीतील घटक पक्षातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Tags: Congress partyDr. Babasaheb AmbedkarHome Minister Amit Shahचंद्रपूरात काँग्रेसकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा : गृहमंत्री अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी करीत व्यक्त केला निषेध.
Previous Post

पारिघा वेल्फेअर फाउंडेशन नाशिक व महिला बाल विकास संयुक्त विद्यामाने लिंग आधारित हिंसाचार जनजागृती अभियान.

Next Post

पुण्याचे भाजप आमदाराच्या मामाची 72 वेळा वार करुन हत्या, हत्येची सुपारी पत्नीनेच दिल्याने खळबळ.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पुण्याचे भाजप आमदाराच्या मामाची  72 वेळा वार करुन हत्या, हत्येची सुपारी पत्नीनेच दिल्याने खळबळ.

पुण्याचे भाजप आमदाराच्या मामाची 72 वेळा वार करुन हत्या, हत्येची सुपारी पत्नीनेच दिल्याने खळबळ.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In