अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 2024 चे आयोजन दिनांक 27 व 28 डिसेंबर 2024 या कालावधीत महेश ज्ञानपीठ हिंगणघाट येथे आयोजित करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन दिनांक 27 डिसेंबरला माजी पंतप्रधान स्व मनमोहनसिंग यांना श्रद्धांजली अर्पण करून श्री. बारापात्रे मुख्य लेखाधिकारी जिल्हा परिषद वर्धा, डॉ. महेश बेहेकर गटविकास अधिकारी पंचायत समिती हिंगणघाट, श्री. गिरीधर राठी अध्यक्ष महेश्वरी युवक मंडळ, श्रीमती अल्का सोनवणे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती हिंगणघाट, सुभाष टाकळे, अशोक कोडापे व अरविंद राठोड शिक्षणविस्तार अधिकारी, कु. वैशाली पोळ प्राचार्य महेश ज्ञानपीठ हिंगणघाट यांच्या उपस्थिती संपन्न झाला.
या विज्ञान प्रदर्शनीत माध्यमिक गट 34 विद्यार्थी प्रतिकृती, प्राथमिक गटातून 69 विद्यार्थी प्रतिकृती, शैक्षणिक साहित्य प्राथमिक गट 05 शैक्षणिक साहित्य माध्यमिक गट 06 व प्रयोगशाळा परिचर गट 06 अश्या एकूण 120 वैज्ञानिक प्रतिकृतीची मांडणी करण्यात आली.
दिनांक 28 डिसेंबरला सर्व प्रतिकृतीचे परीक्षण करून दुपारी 2.00 वाजता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी श्रीमती अल्का सोनवणे गटशिक्षणाधिकारी प.स.हिंगणघाट, श्री. अजय भोयर, अध्यक्ष जिल्हा विज्ञान मंडळ वर्धा, सुभाष टाकळे व अरविंद राठोड शिक्षणविस्तार अधिकारी, कु. वैशाली पोळ प्राचार्य महेश ज्ञानपीठ हिंगणघाट, तसेच सर्व परीक्षक श्री. राजेंद्र चौधरी, दुर्गाप्रसाद यादव, सुनील नागमोते, राजेंद्र मिरापुरकर, विलास येंडे, मीनल गिरडकर, मनीषा साळवे, प्रा.डॉ.मधु गोटे, प्रा.डॉ. गजभिये, प्रा.आष्टनकर, प्रा.रेंडे, प्रा. धार्मिक उपस्थित असून यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
बक्षीस प्राप्त प्रतिकृती माध्यमिक विद्यार्थी गट, प्रथम क्रमांक वैष्णवी कोहळे, म. गांधी विद्यालय कुटकी, व्दितीय क्रमांक अथर्व उरकुडकर, महेश ज्ञानपीठ हिंगणघाट, तृतीय क्रमांक यतार्थ जनैकर भवन्स हिंगणघाट, प्राथमिक विद्यार्थी गट प्रथम क्रमांक पूर्वा दवंडे, स्नेहदीप हिंगणघाट, व्दितीय क्रमांक अवनी कावळे डॉ.बी.आर.आबेडकर विद्यालय हिंगणघाट, तृतीय क्रमांक हर्ष पत्रकार एस.एस.एम विद्यालय हिंगणघाट, शैक्षणिक साहित्य प्राथमिक शिक्षक गट प्रथम क्रमांक निकिता कामडी भारत विद्यालय हिंगणघाट, प्रोत्साहन पर सतीश गौळकर एस.एस.एम विद्यालय हिंगणघाट शैक्षणिक साहित्य माध्यमिक शिक्षक गट प्रथम क्रमांक सुमित बोबडे नि.मु. घटवाई विद्यालय वडनेर, प्रोत्साहन पर मयुरी पडोळे, एस.एस.एम विद्यालय हिंगणघाट, प्रयोगशाळा परिचर गट प्रथम क्रमांक एन.व्ही. अवथरे लोकमान्य विद्यालय दारोडा, प्रोत्साहनपर विजय सुपारे, नवकेतन विद्यालय जामनी तसेच उत्कृष्ट विज्ञान शिक्षक म्हणून गजानन मेघरे, चंद्रशेखर निमट यांना प्रदान करण्यात आला.
हिंगणघाट तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनच्या आयोजन करिता गणित व विज्ञान मंडळाचे सदस्य रवींद्र म्हसके, योगेश खोडे, गजानन नांदुरकर, श्याम मेघरे, सतीश घोडे, गजानन मेघरे, चंद्रशेखर निमट, रविराज अवचट, त्रिशूल लोंढेकर, प्रशांत बाभुळकर सर्व विषयतज्ञ प.स. हिंगणघाट, सर्व विज्ञान प्रदर्शनाचे नियोजन विषयतज्ञ प्रशांत चौधरी व कार्याक्रमचे संचालन नितीन सुकळकर यांनी केले.

