मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून नुकतेच नवनियुक्त जिल्हाधिकारी अवीशांत पांडा यांचे नव्याने नियुक्ती झाली आहे. अवीशांत पांडा यांचे नव्याने नियुक्ती झाल्याने त्यांचे स्वागत करणे आद्य कर्तव्य समजून प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून जिल्ह्यामध्ये चालत असलेल्या अवैद्य धंद्याविषयी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनामध्ये कोंढाळा व मेंढा येथील वाळू घाटातून हजारो ब्रास वाळूचा उपसा झाल्याने शासनाचा लाखो तसेच करोडो रुपयाचा महसूल बुडालेला असल्याने त्या वाळू घाटाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करण्याबाबत आणि जिल्ह्यांमध्ये चालत असलेल्या अवैध्य धंदे कोंबडा बाजार, दारू विक्री, चक्री (फिरकि) आदींवर पोलीस प्रशासनाच्या वतीने कठोर कारवाई करणे बाबत, पत्रकार संरक्षण कायद्याचे काटेकोरपणे अंमलबजावणी करणे बाबत, पत्रकारांना संरक्षण देणे, जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यामध्ये स्वतंत्र पत्रकार भवन निर्माण करणे, पत्रकारांना स्वतंत्र गृहनिर्माण योजना चालू करणे, पत्रकारांना एसटी व बस मध्ये सवलत, डिजिटल मीडिया, प्रिंटेड इलेक्ट्रॉनिक मीडिया या मधील सर्व पत्रकारांना शासनाच्या वतीने अधिस्वीकृती देणे, डिजिटल मीडियातील पत्रकारांना शासकीय जाहिराती मिळणे याबाबत जिल्हाधिकारी अवीशांत पांडा यांना निवेदनातून मागण्या आल्या.
यावेळी जिल्हाधिकारी अवीशांत पांडा यांचे स्वागत करताना व निवेदन देताना प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे जिल्हाप्रमुख दिनेश बनकर, जिल्हा सचिव विजय शेडमाके, जिल्हा संघटक सोमनाथ उईके, जिल्हा उपाध्यक्ष सत्यवान रामटेके, जिल्हा सहसचिव वाघाडे तसेच प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ मधील पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.

