महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- गौतम वार्ड येथील रहवासी कुंताबाई बबनराव जगताप यांचं काल दुःखद निधन झाले. त्या मागील काही दिवसांपासून आजारी हत्या त्याच्यावर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. पण काल पहाटे 3.30 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली.
मनमिळवू स्वभावाच्या स्मुतीशेष कुंताबाई बबनराव जगताप यांचं दुःखद निधन झाल्याने जगताप परिवारावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात 1 मुलगा सिहल जगताप, 4 मुली अजीला मेश्राम, मनीषा, शीतल लढे, कल्याणी सह मोठा आप्त परिवार आहे.
करोना काळात हिंगणघाट येथील रिपब्लिकन पक्षाचे नेते सामाजिक कार्यकर्ते बबनराव जगताप यांचं दुःखद निधन झाले होते. त्यानंतर कुंताबाई यांनी आपल्या परिवाराला आधार देऊन सांभाळ केला होता. त्यांचं आज दुःखद निधन झाल्याने परिवाराचा आधार हरपला आहे.
दिनांक 2 जानेवारी ला दुपारी 3.00 वाजता त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात वणा नदिच्या तीरावर अंतिमसंस्कार करण्यात आला या वेळी हिंगणघाट शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी उपस्थित दर्शवली.

