सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो .9764268694
बल्लारपूर ;-वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर शहर तर्फे दिनांक 3 जानेवारी 2025 ला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम संपन्न
या कार्यक्रमात बल्लारपूर शहरातील विविध शाळेतील छोटे विद्यार्थी ज्यांनी राष्ट्रीय पारंपरिक लाठी स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट प्रदर्शन केलं व पुरस्कार विजेते झाले त्या सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान या कार्यक्रमांमध्ये वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर तर्फे करण्यात आला सावित्री फुले जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमांमध्ये त्रिशरण विहार समितीचे अध्यक्ष मा. संदीप मेश्राम तसेच सचिव हेमराज फुलझेले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते सौ नीता बडघरे कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक तसेच सौ.किरण प्रकाश रामटेके व प्रज्ञाताई नमनकर तालुका संघटिका विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष बल्लारपूर शहराध्यक्ष उमेशभाऊ कडू हे होते सर्वप्रथम मान्यवर अतिथींनी महापुरुषांच्या प्रतिमांना द्वीप प्रजनन करून माल्यार्पन केले सावित्रीबाई फुले यांचा जयघोष केला कार्यक्रमाची सुरुवातीला स्वागत गीताने स्वागत करण्यात आले बल्लारपूर शहर महिला आघाडी अध्यक्षा रेखाताई पागडे यांनी कार्यक्रमांचे प्रास्ताविक केले, तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष अभिलाषा चुनारकर यांनी केले अध्यक्षीय भाषण उमेश कडू यांनी केले व समाजापुढील भावी समस्यांचे व रूप बदलून आलेल्या शिक्षणासंदर्भात सवर्णांच्या प्रतिकाराची नव्या रूपात संदर्भात जाणीव करून दिले व या परिस्थितीत सुद्धा बहुजन समाजाला शिक्षण ग्रहण करण्यासाठी जो संघर्ष करावा लागणार आहे त्याकरता प्रत्येकाने तत्पर राहण्याचे आव्हान याप्रसंगी शहराध्यक्ष उमेश कडू यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले त्यानंतर आलेल्या खेळाडू विद्यार्थ्यांचा व त्यांच्या प्रशिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला राष्ट्रीय पारंपरिक लाठी स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावणारे आयुष मून तसेच रजत पथक पटकावणारे सर्व विद्यार्थी अनिकेत रामटेके, वीरांगणा दुबे ,नुकुर पिंपळे, पंखुडी गावंडे, अनामिका करमरकर, एरान जोग, हर्षदीप नरांजने, अरिहंद शेंडे, सर्व विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला त्यांच्या यशामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे त्यांचे प्रशिक्षक माननीय, प्रशांत पिम्पळे सर, माननीय अहमद सर आणि माननीय मनोज डे सर यांचा सुद्धा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला याच प्रसंगी पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते कुंजबिहारी बडगरे सर, देवराम नंदेश्वरसाहेब, प्रकाश रामटेकेसाहेब ,सुधाकर गेडामकाकाजी, प्रकाशभाऊ तावडे ,दुरेश तेलंग या जेष्ठ कार्यकर्त्यांचा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व आभार प्रदर्शन शहर महासचिव गौतम रामटेके यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पक्षाचे शालूताई चांदेकर ,वनमला भसारकर ,स्वीटी लोंढे, समताताई लाभाणे, रजनी गायकवाड, मंगला झाडे, किरण मेश्राम, सविता नाईक व कार्यकर्ते स्वराज करमरकर ,गोविंदा गोरघाटे, गाणार साहेब यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला ही माहिती एका पत्रकाद्वारे शहर महासचिव गौतम रामटेके यांनी दिली

