मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
भारतातील प्रथम स्त्री शिक्षिका
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंती निमित्ताने दीक्षाभूमी देसाईगंज येथे ३ जानेवारी २०२५ ला अभिवादन करण्यासाठी सम्यक जागृत बौद्ध महिला समिती तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात मार्गदर्शन व त्यानंतर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे महान विचार व कार्य’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. प्रथम क्रमांक अश्विनी माने द्वितीय सोमवती लंजे, तृतीय क्रमांक मंगला रामटेके तर प्रोत्साहन पर पारितोषिक मंदा शिंपोलकर यांनी पटकावले.
प्रमुख मार्गदर्शक संगिता शेंडे यांनी सावित्रीबाईंनी समोर आलेल्या प्रत्येक अडचणींचा जिद्दीने सामना केला व आपले कार्य अखंडपणे सुरू ठेवले ते गुण प्रत्येक स्त्री ने अंगीकारून आपली व सामाजिक प्रगती केली पाहिजे असे म्हटले तर प्रा. पल्लवी रामटेके यांनी सावित्रीबाईंच्या जिवनावर प्रकाश टाकला. उद्घाटक कल्पना कापसे यांनी सामाजिक काम करणाऱ्या स्त्रियांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो तर सावित्रीबाईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले काम अखंडपणे सुरू ठेवले गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात अपर्णा राऊत यांनी सावित्रीबाई यांचा आदर्श महिलांनी समोर ठेवून टोकाचे निर्णय न घेता आपले ध्येय साध्य करायला हवे असे म्हटले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरीता बारसागडे संचालन मोनिका अटाळकर तर आभार ममता जांभूळकर यांनी केले कार्यक्रमाकरिता यशोदा मेश्राम, रत्नमाला बडोले, प्रतिभा बडोले, लीना पाटील, आशा रामटेके, दुर्गा रंगारी, सुनीता नंदागवळी ममता रामटेके, प्रतिमा शेंडे, जांभूळकर सर आशिष घुटके यांनी सहकार्य केले

