मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील विविध विकास कामे गेल्या नऊ वर्ष पूर्वीपासून सुरू आहे. परंतु ते पूर्ण होऊन जनतेच्या सेवेत कार्यरत का होऊ शकली नाही. ती पूर्ण होण्याची शक्यता आहे काय ?याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे निवेदन देण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत घुसे तथा सतीश धोबे माजी नगरसेवक तथा तालुका प्रमुख, शिवसेना हिंगणघाट यांच्या नेतृत्वात या शहरातील काही अत्यंत महत्त्वाचे व जनतेच्या हिताचे विकास कामे कधी पूर्ण होणार! या संदर्भात विचारणा करण्याकरिता मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यांत आलें.
मुद्दे खालील प्रमाणे आहे.
मुद्दा क्र .१).सन २०१६ पासून नगरपरिषद वर भाजपची सत्ता असताना, अमृत योजनेतील नवीन पिण्याचे पाईपलाईन तसेच भूमिगत गटार योजनेचे काम सुरू झाले. सदर काम हे २०२० पर्यंत पूर्ण करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. परंतु आजपर्यंत हि दोन्ही कामे पूर्ण झाली नाहीत. सध्या नगरपरिषद येथे प्रशासन असताना सुद्धा स्थानिक आमदार यांच्या देखरेखीखाली या योजनेचा तथा इतर कामे सुरू आहे. परंतु अजूनपर्यंत जनतेला या योजनेचा लाभ का होऊ शकला नाही. अजून किती दिवसांनी ही योजना कार्यान्वित होऊ शकेल ? याबद्दल आपण वेळ निश्चित करून द्यावे. आजही शहरातील बऱ्याच ठिकाणी जनतेला पिण्याच्या पाण्याकरिता अडचण निर्माण होत आहे. व पुढे एक महिन्यात उन्हाळा सुरू होणार आहे.
मुद्दा क्र.२) मागील एक वर्षा पूर्वीपासून जन्म व मृत्यू विभागात जनतेला, जन्माचा व मृत्यूचा दाखला मिळण्याकरिता फेऱ्या मारून सुद्धा प्रमाणपत्र मिळत नाही. त्यांना बरेचं कारणे सांगितले जाते. सध्या सर्वर डाऊन आहे, नवीन सर्वर कार्यान्वित केले आहे, त्यामुळे कमीत कमी दोन ते तीन महिने प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होऊ शकतो, असे सांगण्यात येते. आपल्या कार्यालयात कर्मचारी मोठ्या प्रमाणात असताना सुद्धा या ठिकाणी व्यवस्था पुरेशी नसल्याने जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतदानी यांनी त्यांच्या कार्यकाळात घोषणा केली होती की , आम्ही जनतेला घरपोच जन्माचे व मृत्यूचे प्रमाणपत्र देण्यात येईल. परंतु प्रमाणपत्र कार्यालयातून मिळणे सुद्धा कठीण झाले आहे. कुठे गेले माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी यांचे ते आश्वासन.
मुद्दा क्र.३) टॅक्स विभागात सामान्य जनतेचे घराचे फेरफार, घर बांधकाम मंजुरी मिळण्याकरिता वेळ लागत आहे. त्याबाबत आपण काय उपाययोजना करणार आहात.
मुद्दा क्र.४) शहरातील विविध प्रभागात स्वस्थ विभागामार्फत साफसफाईचे व स्वच्छता काम बरोबर होत नसल्याने, लोकांना मोठ्या प्रमाणावर नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्या ठिकाणी काही कर्मचारी स्वतःच्या आस्थापनेवर दुसऱ्या व्यक्तीला महिन्याला पैसे देऊन त्या बदल्यात त्याच्याकडून काम करून घेत आहे. त्यामुळे प्रत्येक नाली व नाल्याची साफसफाई व्यवस्थित होत नाही. ज्यावेळेस नालीची साफसफाई पूर्ण झाली तर, त्या नाली मधून काढलेला गाळ बंडी चालविणारा तो गाळ उचलून घेऊन जात नाही. परत त्याच ठिकाणी त्या नाली तो गाळ पडतो व नाली तुंबते त्यामुळे या विषयाचा सुद्धा या सामान्य लोकांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. याबद्दल आपण तात्काळ लक्ष वेधून उपाययोजना करावी.
मुद्दा क्र.५) नगरपरिषद अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना उदाहरणार्थ रस्ता अनुदान, दलित वस्ती सुधार योजना, नगरौत्थान योजना, विशेष अनुदान ,नाविन्यपूर्ण योजना या सर्व योजना स्थानिक आमदार महोदयच्या बोलण्यावरून विविध प्रभागात वार्डातील कामाचे निवड करण्यात येते. ज्या वार्डात प्रभागात विरोधक नगरसेवक असेल , त्या ठिकाणचे विकास कामे रद्द करण्यात सांगितल्यावर आपण ते कामे रद्द करून उर्वरित कामे मा.आमदार महोदय कडून मंजुरी घेऊन प्रशासकीय मान्यते करिता जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे अभियंता मार्फत पाठविले जातात . या सर्व कामात आमदार महोदयाचे काहीही देणे घेणे नसतांना सुद्धा आपण चुकीचे का करता. हे आम्हाला अजून पर्यंत कळले नाही. मा.आमदार महोदयच्या दबावाखाली आपण काम करीत आहे कां ? असा आमचा आपल्यावर थेट आरोप आहे.
मुद्दा क्र.६). नगरपरिषदेला जनतेच्या सुरक्षेविषयी काहीच देणे घेणे नाही. असा आमचा आपल्यावर थेट आरोप आहे .कारण यापूर्वी आम्ही आपल्याला पत्र दिले होते की, शहरात मोकाट जनावरे, श्वान मोठ्या प्रमाणात असल्यामुळे जनतेला त्याचा त्रास होतो आहे. जनता सुरक्षित नाही, कारण मोकाट श्वान चावा घेऊन बर्याचशा नागरिकांना जखमी केले आहे .तसेच मोकाट जनावरे रस्त्यावर बसून रस्त्यावरील वाहने चालविण्यास त्रास होतो आहे. नगरपरिषदच्या वतीने त्यावेळेस आम्हाला असे कळविले होते की, नगरपरिषदेचा कोडंवाडा कवडघाट रोडवर तयार करून जनावरे त्या ठिकाणी कोंडले जाईल. त्याचे काय झाले? कुणाच्या दबावाखाली तो कोंडीवाडा बंद झाला. याचं सुद्धा लेखी उत्तर आपण द्यावे.
मुद्दा क्र.७). तसेच शहरातील मुख्य चौकात व इतर ठिकाणी लावण्यात येणाऱ्या बॅनर्स ,पोस्टर्स याबाबत, आपली दुटप्पी भूमिका असल्यामुळे आपण एका राजकीय पक्षाला (भाजप)सवलती देतात आणि दुसऱ्या राजकीय पक्षाला दंडित करतात .आपण या ठिकाणी ज्या अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला संबंधित आस्थापनेवर काम करण्याची जबाबदारी दिली , त्याची आपण तात्काळ बदली करावी. जर आपण सदर बदली करू शकले नाही तर, आम्हाला वाटेल की ,आपण मा. आमदार महोदयांच्या दबावाखाली त्याची बदली रद्द करीत नाही. यातून स्पष्ट होईल.
मुद्दा क्र.८). आपल्या कार्यालयातील कर्मचारी पैकी एक कर्मचारी दारूची सर्रासपणे विक्री करतो आहे. जर आपण त्याचेवर कार्यवाही केली नाही तर, पोलीस विभागामार्फत जर त्या व्यक्तीवर कारवाई केली . त्या ठिकाणी नगर परिषदेची बदनामी होईल .याचे जबाबदार आपण स्वतः रहाल.
मुद्दा क्र. ९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री आवास योजनेतील सर्वांना घरे मिळण्याकरिता, आपले शहर हे झपाट्याने वाढत आहे. नवीन भूखंडावर ले-आउट तयार होऊन, त्यातील प्लॉटची विक्री होत आहे. व या शहरातील कष्टकरी, शेतमजूर, इतर काम करणारा मजूर हा शहराबाहेरील पडलेल्या ले-आउट वर भूखंड ( प्लॉट ) विकत घेत आहे. परंतु सदर भूखंड हे आपल्या शहराच्या हद्दी पलीकडे आहे. जसे काही पिंपळगांव, शाहलगंडी, नांदगाव इत्यादी ठिकाणचा आपल्या शहरात हद्द वाढीचा प्रस्ताव दर सहा महिन्यांनी किंवा वर्षांनी नगररचनाकार विभाग वर्धा यांना पाठवून मंजुरी घ्यावी. जेणेकरून या कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर व इतर मजुरी करणाऱ्या या व्यक्तींना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ होऊन, त्यांची निवाऱ्याची सोय होईल.
वरील सर्वे मुद्दे या शहरातील जनते करिता महत्वाचे आहे. आपण यावर तात्काळ उपाययोजना करावी, अन्यथा आम्हाला आपल्या दालनात बसून, आपणास घेराव घालून, या मुद्द्याकरिता निदर्शने करावे लागतील. याची नोंद घ्यावी. अशी सक्त ताकीद शिवसेनेच्या वतीने मुख्यधिकारी यांना दिले.
वरील निवेदन देताना पक्षाचे उपतालुकाप्रमुख प्रकाश अनासाणे, मनीष देवडे, श्रीधर कोटकर, गजानन काटवले, शंकर मोहमारे, भास्कर ठवरे, मनोज वरघणे, फिरोजखा पठाण, नितीन वैद्य, नरेंद्र गुऴकरी, पप्पू घवघवे, प्रशांत कांबळे, अनंता सोरटे, भास्कर भिसे, प्रशांत सुपारे, मनोज धनवंत, चंद्रकांत ठाकरे, संजय रहाटे, विजय कोरडे, दिनेश धोबे, सचिन मुळे,हिरामण आवारी, विलास धोबे, बलराज डेकाटे, अतिक मिर्झा, चगेज खान, रितिक लढी, सुभाष काटकर, शितल चौधरी, पांडुरंग निखाडे, हरर्दिप काळे, निशिकांत नागोसे, उमेश धोबे, अशोक भगत, विमल तडस, शोभा मडावी, मनीषा पाटील, मायाबाई वाकडे, संतोष भोयर, रवी भोयर, मयूर ठाकरे, संजयला सोनुलकर, दिलीप डऺभारे, मारुती अरहाडे, सोनू भगत, दिलीप वैद्य, अजय दिवटे, नईम शेख, हुसेन भाई, विजय भोयर, पिंटू शहारकर, राहुल मोहितकर, सौरभ कांबळे, संदेश मानकर इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.

