मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आमदार समीर कुणावार यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत हिंगणघाट नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष निलेश ठोंबरे व माजी नगरसेवक धनंजय बकाणे यांचा राज्यमंत्री ना.पकंज भोयर आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते तथा माजी खासदार रामदास तडस जिल्हाध्यक्ष सुनील गफाट आमदार राजेश बकाणे आमदार सुमीत वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला यावेळी दोन्ही नेत्यांच्या प्रवेशांनी हिंगणघाट शहरातील पक्ष संघटनेला बळकटी मिळाली असल्याची भावना आमदार समीर कुणावार यांनी व्यक्त केली असून पक्षात त्यांचे सहर्ष स्वागत असल्याची प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी दिली.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे, वसंतराव आंबटकर, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अंकुश ठाकूर, जिल्हा महामंत्री आकाश पोहाणे, संजय डेहणे, भुषण पिसे, संजय माडे, आशिष पर्बत, विनोद विटाळे, वामण चंदनखेडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

