Saturday, February 28, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपूर: एम्स रुग्णालयातील महिला डॉक्टरची तब्बल 13 लाख 74 हजार रुपयांची सायबर चोरांनी केली फसवणूक.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 22, 2025
in क्राईम, देश विदेश, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपूर: एम्स रुग्णालयातील महिला डॉक्टरची तब्बल 13 लाख 74 हजार रुपयांची सायबर चोरांनी केली फसवणूक.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- देशात आणि राज्यात सायबर गुन्ह्याचे प्रमाण मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यात नागपूर येथील एम्स रुग्णालयातील महिला डॉक्टरची तब्बल 13 लाख 74 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

नागपुरातील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस एम्समध्ये कार्यरत असलेल्या महिला डॉक्टर या नागपुरातील चिंचभवन येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गेल्या. त्यांना बँक खात्यातील 8 लाख रुपयांचे पोस्टात फिक्स्ड डिपॉजिट करायचे होते. त्यांनी बँकेतून फिक्स्ड डिपॉजिट केलं. मात्र, त्यांच्या बँक खात्यातून पैसे एफडीत वळते झाले नव्हते. त्यामुळे त्या चौकशी करण्यासाठी बँकेत गेल्या. पण हे सगळं तुम्ही ऑनलाईन तपासू शकता, स्टेटस चेक करू शकता, असं त्यांना बँकेतून सांगण्यात आलं.

महिला डॉक्टर या घरी परतल्या आणि त्यांनी ऑनलाईन प्रक्रिया करून बघितली. पण ऑनलाईन काम करण्यात अडचण येत होती. त्यामुळे त्यांनी इंटरनेटवर कस्टमर केअरचा नंबर शोधला. त्यात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या टोल फ्री नंबर होता. पण तो क्रमांक लागत नसल्या कारणाने त्यांनी ‘जस्ट डायल’ या ऑनलाईन साईड वरून स्टेस्ट बैक ऑफ इंडिया ग्राहक सेवा कॅस्टमर केअरचा नंबर काढला.

त्यानंतर त्यांनी त्या क्रमांकावर फोन केला. तर समोरून “मी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चिंचभवन बँकेतून बोलतोय” असं सांगण्यात आलं. त्यामुळे महिला डॉक्टरलाही विश्वास बसला. त्यांनी समोरची व्यक्ती सांगेल, तशी प्रक्रिया केली. “मी तुम्हाला एक फाईल पाठवतो. तुम्हाला ती ओपन करायची आहे,” असं त्यांना समोरून सांगण्यात आलं. त्यांनी त्या फाईलवर क्लिक केलं आणि त्यांचा फोनचा ताबा त्या गुन्हेगाराकडे गेला. पूर्ण एक दिवस त्या गुन्हेगाराकडे त्या मोबाईलचा ताबा होता. त्यामुळे फोनवर आलेले ओटीपी, मेसेज सर्व त्या सायबर गुन्हेगारानं डिलिट केलं.

पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना आणखी काही एसएमएस मॅसेज दिसले आणि काहीतरी गडबड असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चिंचभवन शाखेत धाव घेतली, तर त्यांच्या बँक खात्यातून इतके पैशांचा व्यवहार बँकेतून झाला नाही असं समोर आलं. त्यांच्या बँक खात्यातून 10 लाख 90 हजार रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर झाले आणि त्यांच्या एफडी खात्यावरही 2.84 लाख रुपयांचं कर्जही दाखवत होतं.

यावेळी बँकेला याबाबत विचारणा केली असता आमच्याकडून असे कुठलेही फोन येत नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी बेलतरोडी पोलिस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार नोंदविली. यावेळी पोलिसांनी महिलेची तक्रार नोंदवून घेत या घटनेचा सायबर पोलीस तपास करीत आहे.

Tags: Nagpurनागपूर: एम्स रुग्णालयातील महिला डॉक्टरची तब्बल 13 लाख 74 हजार रुपयांची सायबर चोरांनी केली फसवणूक.सायबर चोर
Previous Post

बल्लारपूर चे मुख्य रस्ते *तारणहार करण्यात यावे अशी वंचित बहुजन आघाडी तर्फे तहसिलदार यांना निवेदन.

Next Post

मित्रांनी दिलेली इंडिका विकून रुग्णवाहिका घेणार रुग्णसेवक औलिया, रुग्णभक्त गजूचा रुग्णसेवेचा ध्यास.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मित्रांनी दिलेली इंडिका विकून रुग्णवाहिका घेणार रुग्णसेवक औलिया, रुग्णभक्त गजूचा रुग्णसेवेचा ध्यास.

मित्रांनी दिलेली इंडिका विकून रुग्णवाहिका घेणार रुग्णसेवक औलिया, रुग्णभक्त गजूचा रुग्णसेवेचा ध्यास.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In