सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो 9764268694.
बल्लारपूर :-दिनांक 21 जानेवारी 2025 ला वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर तसेच वंचित बहुजन महिला आघाडी तर्फे माननीय तहसीलदार महोदयांना निवेदन देण्यात आले निवेदनात मागणी करण्यात आली आहे की बल्लारपूर शहराचा मुख्य रस्ता नॅशनल हायवे हा लावारिस आहे याकरिता माननीय तहसीलदार महोदय बल्लारपूर शहराचे पालक या नात्याने या रस्त्याचे तारणहार व्हावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे बल्लारपूर शहरातील मुख्य रस्ता गेले अनेक वर्षापासून बेवारस पडल्यासारखा आहे ज्या ठिकाणी बांधकाम विभागाने काँक्रीट तपासणीसाठी गड्डे केलेले आहेत ते सुद्धा तसेच सोडून देण्यात आले आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाईप लाईन साठी तो सुद्धा दुरुस्त करण्यात आलेला नाही तसेच नुकत्याच एका आलूच्या ट्रकचा अपघात होऊन त्याचा चालक त्यामध्ये मृत पावलेला आहे तरीसुद्धा कोणत्याही विभागाने ह्या रस्त्यावर साधे फलक लावलेले नाही धोकादायक वळण किंवा अपघात प्रणव स्थळ अशा प्रकारचे फलक सुद्धा लावलेला नाही त्यामुळे हा रस्ता जीव घेणार असता झालेला आहे करिता वंचित बहुजन आघाडीने मागणी केलेली आहे की माननीय तहसीलदार महोदय यांनी संबंधित सर्व विभागांची टोल कार्यालयाचे अधिकारी तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी बल्लारपूर पेपर मिल चे अधिकारी नगर परिषदेचे अधिकारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी व परिवहन विभागाचे अधिकारी या सगळ्यांची संयुक्त बैठक घेऊन माननीय तहसीलदार यांनी कार्यनिर्देश द्यावे अशी मागणी आज करण्यात आलेली आहे पुन्हा एक निवेदन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालय उपविभागीय अभियंता यांना देण्यात आले महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला गेल्या अनेक महिन्यापासून वंचित बहुजन आघाडी तसेच महिला आघाडी निवेदन देत आहे काही उपाययोजना केल्यानंतर पुन्हा परिस्थिती तसेच निर्माण होत आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने आता मागणी केलेली आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने बल्लारपूर शहराला 24 तास पाणीपुरवठा करावा तेव्हाच मीटर सिस्टम ची सक्ती करावी अन्यथा सरासरी बिलाकारणी करण्यात यावी व याकरिता निवेदन दिल्यापासून सात दिवसाच्या आत वरिष्ठांचे उत्तर वंचित बहुजन आघाडीला ्राप्त व्हावे अशी मागणी सुद्धा यावेळेस महाराष्ट्र जीवन प्राधिकार्यांच्या अधिकाऱ्यांनां करण्यात आली जर जर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जनतेला दिलासा मिळेल असे उपाययोजना न केल्यास आता वंचित बहुजन आघाडी आंदोलनात्मक भूमिकेत येणार आहे असा इशारा देण्यात आला
व शहरातील नागरिकांना सुद्धा वंचित बहुजन आघाडी तर्फे आव्हान करण्यात येत आहे की ज्यांचे मीटर हवेच्या दाबाने फिरत असेल त्यांनी मीटरची व्हिडिओ रेकॉर्डिंग करावी व ती रेकॉर्डिंग वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यां पर्यंत पोहोचवावी जर पाणी गडुळ येत असेल तर त्याचे सॅम्पल देखील व्हिडिओ रेकॉर्डिंग करुण जमा करावा व ते सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्या पर्यंत पोहोचवावे असे आव्हान शहराध्यक्ष उमेशभाऊ कडू यांनी नळ ग्राहकांना केले आहे निवेदन सादर करण्याकरिता वंचित बहुजन आघाडीचे
शहराध्यक्ष उमेशभाऊ कडू, महिला आघाडी शहराध्यक्ष रेखाताई पागडे, शहर महासचिव गौतम रामटेके, , युवा आघाडी तालुकाध्यक्ष अभिलाष चुनारकर, डी.वाय. नंदेश्वरसाहेब, महेंद्र निवलकर , सुधाकर गेडामजी , नीलकंठ मजगवळी , विशाल डुमबरे, शरद पाटिल, आशाताई भाले, रेखातई मेश्राम, दर्शनाताई रिंगने, सुरेखाताई भगत,दामयंतीताई सातपुते, आशाताई मानवटकर, शोभाताई मजगवळी, शोभाताई दुपारे, समता लभाणे, सविताताई थूलकर,सुषमा ऊंबरकर, शालू चांदेकर,बहुजन आघाडीचे आधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती एका पत्रकाद्वारे शहर महासचिव गौतम रामटेके तो यांनी दिली

