मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
एटापल्ली : तालुक्यातील गेदा येथील जय जगदंबा क्रीडा मंडळ यांच्या वतीने भव्य ग्रामीण महिला व पुरुषांचे कब्बड्डी सामन्याचे आयोजित केले आहे.या कब्बड्डी स्पर्धेचे उदघाटन आविसं,काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्रचे समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे संचालक अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आली.
कब्बड्डी अ’गटसाठी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे.द्वितीय पारितोषिक विनोबा आश्रम शाळा गेदा कडून तसेच तृतीय पारितोषिक रमेश वैरागडे ग्रामपंचायत सदस्य गेदा यांचे कडून देण्यात येत आहे.
कब्बड्डी ब’गटसाठी प्रथम पारितोषिक माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार कडून द्वितीय पारितोषिक प्रज्वल नागुलवार आविस सचिव तथा काँग्रेसनेते यांच्या कडून तृतीय पारितोषिक रमेश वैरागडे ग्रामपंचायत सदस्य यांचे कडून देण्यात येत आहे.
महिला कबड्डी स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक नागोसे साहेब (RO) कडून द्वितीय पारितोषिक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गेदा कडून देण्यात येत आहे.या कार्यक्रमचे सहउदघाटक व अध्यक्ष म्हणून आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतु मडावी आणि रमेश वैरागडे ग्रामपंचायत सदस्य हे होते.
यावेळी मिरवा पदा ग्रामपंचायत सदस्य गेदा,मुकेश पदा पोलीस पाटील गेदा,चैतु पंगाटी,प्रशांत गोडसेलवार नगरसेवक नगरपंचायत अहेरी,शंकू पद,संतोष कोरसामी,दिनेश नरोटी,हेमंत वैरागडे,रोशन पदा, आशिष गुंडरु,दिवाकर कुडयेटी,सोमाजी गावडे,देवानंद पंगाटी,साधू पदा,अजय गुंडरु,कैलाश पंगाटी,सूर्यप्रकाश चांदेकर,दसरूजी पदा,ताजने सर माध्य.मुख्याद्यापक गेदा,प्रमोद कोडापे जेष्ठ कार्यकर्ते दमरंचा,प्रमोद गोडसेलवारसह परिसरातील क्रीडा प्रेमी तसेच स्थानिक कार्यकर्ते,गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

