Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

शहीद जवान महेश नागुलवार यांना शासकीय इतमामात श्रद्धांजली.

मधू गोंगाले by मधू गोंगाले
February 12, 2025
in गडचिरोली
0 0
0
शहीद जवान महेश नागुलवार यांना शासकीय इतमामात श्रद्धांजली.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

*सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्याकडून कुटुंबीयांचे सांत्वन*

गडचिरोली, दि. १२ : माओवाद्यांविरोधात मोठी कारवाई करताना वीरगती प्राप्त झालेले सी-60 कमांडो महेश नागुलवार यांच्यावर आज त्यांच्या गावी, अनखोडा (ता. चामोर्शी), शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी सह पालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली व कुटुंबीयांचे सांत्वन केले.

पोलीस पथकाने बंदुकीच्या फैरी झाडून शहीद जवानाला मानवंदना दिली. आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल आणि इतर मान्यवरांनीही पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

*पोलीस मुख्यालयात मानवंदना*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

तत्पूर्वी, आज सकाळी गडचिरोली पोलीस मुख्यालयातही शहीद महेश नागुलवार यांना पोलीस मानवंदना देण्यात आली. यावेळी अतिरिक्त पोलीस महासंचालक (स्पेशल ऑपरेशन) राजकुमार व्हटकर, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल, तसेच सीआरपीएफचे पोलीस अधीक्षक सुमित वर्मा आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

*नक्षलविरोधी कारवाईत वीरमरण*

भामरागड तालुक्यातील फुलनार जंगल परिसरात सी-60 जवानांनी नक्षलवादी तळ उद्ध्वस्त करण्याची मोठी कारवाई केली होती. मात्र, या कारवाईदरम्यान महेश नागुलवार यांना गोळी लागली. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुली असा आप्तपरिवार आहे.
०००

Previous Post

दीक्षाभूमी देसाईगंज येथे रमाई महोत्सव मोठया उत्सहात साजरा.

Next Post

13 वर्षीय विद्यार्थिनीचा विजेचा झटका बसून मृत्यू, महावितरण कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी.

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
13 वर्षीय विद्यार्थिनीचा विजेचा झटका बसून मृत्यू, महावितरण कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी.

13 वर्षीय विद्यार्थिनीचा विजेचा झटका बसून मृत्यू, महावितरण कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In