सहयोग महिला बचत गटाचे टीम लीडर भाऊराव शास्त्रकार यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809
आज दि. 11/03/2025 रोज मंगळवार ला शाखा अहेरी येथे स्वयंसेविका/ स्वयंसेवक मासिक बैठक घेण्यात आली आहे.या बैठकी मध्ये मागील महिन्याच्या कलेक्शनचा आढावा बैठक घेऊन स्वयंसेवक यांना नविन खाते काढण्यासाठी मोटिवेशन करण्यात आले. तसेच स्वयंसेविका यांनी पेंडिंग कलेकशन जमा करावे, अशी सूचना देण्यात आले. स्वयंसेवक चे काम व कमिशन कसे वाढवता येईल यावर मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले आहे . सध्या चालु महिना हा आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असल्याने विशेष करून FD खाते तसेच जास्तीत जास्त पेंडिंग कलेक्शन जमा करावे असे आवाहन करण्यात आले. अशा पद्धतीने सभेची सांगता करण्यात आली. सभेला मार्गदर्शन श्री. मा. शाखा व्यवस्थापक देवेंद्र दुर्गे सर तसेच, मा. भाऊराव शास्त्रकार सर (SMBG TL), मा. राकेश मेश्राम सर ( SS Trainer) व शाखेतील सर्व BDO,BDE,BO,RO (CASA) स्वयंसेवक/स्वयंसेविका मोठया प्रमाणात उपस्थीत होते.

