मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
जिल्हा परिषद गडचिरोली व ओपन लिंक फांउडेशन यांच्यातील सामंजस्य करार अंतर्गत राबविण्यात येणारा आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम अर्थात विनोबा (बा) अॅपच्या माध्यमातून जिल्हयातील उपक्रमशील शिक्षकांना प्रत्येक महिन्यात प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
फेब्रुवारी महिव्यात अहेरी तालुका स्तरावरील ‘पोस्ट ऑफ मंथ’ विजेत्या शिक्षिका कु. शैलजा गौरकर ( जि.प.उ.प्रा. शाळा बोरी ) यांना पोस्ट ऑफ मंच चे प्रमाणपत्र तथा प्रोत्साहनपर बक्षिस कीट देऊन S.M.C. च्या सक्षमीकरण प्रशिक्षणाच्या समारोपीय कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. (शिक्षिका गोरेकर यांना जुलै महिन्यात सुद्धा सन्मानित करण्यात आले होते हे विशेष )या कार्यक्रमात अहेरी पं.स विस्तार अधिकारी विनोद पुसलवार , सुनिल आईंचवार तसेच विनोबा भावे कार्यक्रम चे जिल्हा समन्वय चंदन रापर्तीवार तसेच S.M.C. सक्षमीकरण प्रशिक्षणाचे प्रशिक्षक कोंडागुरले सर, बावणे सर उपस्थित होते.

