भामरागड राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे तालुका अध्यक्ष भिमराव वनकर यांची मागणी.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
भामरागड:
गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्प आहे.जिल्ह्यातील हजारो नागरिक आपल्या उपचारासाठी व विविध मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी हजारो रुग्ण येत असतात व त्यांना सध्या तरी शासकीय आरोग्य सेवा पेक्षाही उत्कृष्ट सेवा हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्प येथे मिळत असतात व प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरीब आदिवासी नागरिकांचे आरोग्य सेवेचे प्रमुख स्थान म्हणजे हेमलकसा आहे.येथील लोक बिरादरी प्रकल्प बनलेला आहे आणि या लोकप्रिय प्रकल्पात आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी दररोज शेकडो नागरिक सिरोंचा पासून हेमलकसा येत असतात परंतु बस अभावी सर्व प्रशासन प्रवाशांना या ठिकाणी तात्कळत उभे
राहावे लागत असते.
व त्यामुळे खूप गैरसोय होत आहे. आंतर जिल्हा बसेस सेवेमध्ये प्रामुख्याने सिरोंचा ते कमलापूर,दामरंचा हा मार्गे जवळ व या भागातील डांबरीकरण रस्ते गुळगुडीत असून या मार्गांचे जवळ व रुग्णांना जायला सोयीस्कर होईल. भामरागड बस सुरू करण्यात यावा.सदर मार्ग सिरोंचा, रेपणपल्ली, कमलापूर,राजाराम, छल्लेवाडा, आसा,नैनर,दामरंचा , मन्नेराजाराम,बामनपल्ली जिजगाव, ताडगाव व भामरागड या मार्गाने सुरू करण्यात यावा. त्याचप्रमाणे प्रामुख्याने भामरागड ते एटापल्ली मार्गे बस सुरू करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे भामरागड तालुका अध्यक्ष भीमराव वनकर यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे केले आहे,

