सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो 9764268694.
वंचित बहुजन महिला आघाडी बल्लारपूर द्वारे दिनांक 25 एप्रिल 2025 ला जम्मू कश्मीर येथील पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर झालेल्या आतंकवादी हमला निषेधार्थ अमृता नागरिकांच्या सांत्वनाकरिता श्रद्धांजली अर्पण करून शांति केंडल मार्च आयोजन करण्यात आले होते शांती कॅन्डल मार्च पाली बुद्ध विहार विद्यानगर वार्ड येथून प्रारंभ होऊन जुनी नगरपरिषद परिसर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याजवळ समापन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष उमेशभाऊ कडू होते वरिष्ठ कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले व त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले त्यानंतर रेखा पागडे शहराध्यक्षा वंचित बहुजन महिला आघाडी यांनी आपले मत व्यक्त केले व मागणी करण्यात आली की झालेल्या आतंकी हमल्याचा बदला घेण्यात यावा व जखमींना तसेच मृत शहिदांच्या परिवारांना सरकारने मदत द्यावी व हे सरकार पर्यटकांची सुरक्षा करण्यामध्ये अवयशस्वी ठरले त्यामुळे आंतरिक जे काही चूक झाली असेल त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी त्यासोबतच आम्ही भारताचे नागरिक या नात्याने देशाने घेतलेल्या प्रत्येक निर्णयासोबत खंबीरपणे उभे आहोत हे सुद्धा यावेळेस नमुद करण्यात आले व धार्मिक सलोखा राखण्यासाठी धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्या प्रसारमाध्यमांवर सुद्धा कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळेस करण्यात आली व सर्व भारतीयांना आवाहन करण्यात आले अफवांवर दुर्लक्ष करावे व आपसातील सलोखा व बंधूत्वाला तळा जाऊ देऊ नये असा संकल्प घेऊन शहिदांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली याप्रसंगी वंचित बहुजन महिला आघाडीचे सर्व महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

