Wednesday, February 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

काँग्रेस नेते कंकडालवारांचे चक्काजाम आंदोलनाच्या इशाऱ्याची कार्यकारी अभियत्यांनी घेतली गंभीर दखल.

मधू गोंगाले by मधू गोंगाले
April 27, 2025
in गडचिरोली
0 0
0
काँग्रेस नेते कंकडालवारांचे चक्काजाम आंदोलनाच्या इशाऱ्याची कार्यकारी अभियत्यांनी घेतली गंभीर दखल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आल्लापल्ली ते गुड्डीगुडम व गोल्लाकर्जी ते रेपनपल्लीपर्यंतचे रस्त्याचे कामाला सुरुवात.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

अहेरी : आल्लापल्ली ते गुड्डीगुडम व गोल्लाकर्जी ते रेपनपल्ली गावापर्यंत राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने सुरु असून या मार्गावरून उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढल्याने तात्काळ रस्त्याचे कामाला गतीने सुरुवात न केल्यास 26 एप्रिलला गुड्डीगुडम येथे चक्काजाम आंदोलन करण्याची इशारा काँग्रेस नेते व जि.प. माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला होता.

काँग्रेस नेते कंकडालवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले कि,सदरहू राष्ट्रीय महामार्गांवर संबंधित कंत्राटदार यांनी काम संथगतीने सुरु ठेवत निव्वळ गिट्टी व मुरूम पसरवून ठेवले होते.मागील वर्षी पावसाळ्यात या मार्गांवरून ये -जा करतांना नागरिकांना नाहक त्रास सहन करावं लागला होता.कंत्राटदार व संबंधित अधिकारी पावसाळा जवळ आल्यावर कामाला सुरुवात करतात मग याची फटका नागरिकांना बसत आहे.नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्या कंत्राटदारावर कायदेशीर कारवाईची मागणी केले होते.

तसेच आल्लापल्ली जवळील सिरोंचा पुलाचे बांधकाम पावसाळ्यासमोर सुरु केल्याने पावसाळ्यात परत इथे दळण -वळणाची खूप मोठी समस्या निर्माण होणार आहे.म्हणून पुलाचे कामाला गती देण्याची मागणी सुद्धा केली होती.

काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांची चक्काजाम आंदोलनाची इशाऱ्याची कार्यकारी अभियंत्यांनी दखल घेत त्यांनी आंदोलनापूर्वीच संबंधित कंत्राटदाराकडून आलापल्ली ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गाचे सुरु करायला लावले.

काँग्रेस नेते कंकडालवार यांनी आंदोलनाची दिलेल्या निवेदनाची उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे आणि अहेरीचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी गांभीर्याने घेत राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता आणि संबंधित कंत्राटदार आणि कंकडालवार यांचे प्रतिनिधी सोबत बैठक घेतली होती.

या बैठकीत राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंत्यानी उपस्थित अधिकारी व कंकडालवार यांचे जनप्रतिनिधी काँग्रेस नेते हणमंतू मडावी,माजी सरपंच अज्जू पठाण,नगरसेवक प्रशांत गोडशेलवार,अजय नैताम माजी जि.प.सदस्य,सुनीता कुसनाके माजी जि.प.सदस्य,नरेंद्र गर्गम,कार्तिक तोगम,भास्कर तलांडे माजी पंचायत समिती सभापती,सुरेखा आलाम माजी पंचायत समिती सभापती,माजी सभापती गीता चालूरकर,यांचे समोर जि.प माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी निवेदनरूपी मांडलेल्या मागण्यांची विभागामार्फत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले.राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिल्याने कंकडालवार यांनी विनंती ला मान देऊन आपले चक्काजाम आंदोलन तात्पुरते मागे घेतले आहे.

Previous Post

अहेरी येथील रुक्मिणी महालात आदिवासी विकासमंत्री प्रा.अशोकजी उईके यांची सदिच्छा भेट, राजे अम्ब्रिशराव महाराजांनी केले स्वागत.

Next Post

अवैध उत्खननावर ४७ कारवायांत २९ लाखांचा दंड.

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
अवैध उत्खननावर ४७ कारवायांत २९ लाखांचा दंड.

अवैध उत्खननावर ४७ कारवायांत २९ लाखांचा दंड.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In