चौकशी करून कारवाई करण्याचे मागणी सामाजिक कार्यकर्ते शंकर डोलगे यांनी बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
मा. मुख्य वनसंरक्षक साहेव, प्रादेशिक वनवृत्त गडचिरोली
मा. उपवनसंरक्षक साहेब, वनविभाग, आलापल्ली जिल्हा गडचिरोली
विषय क्र.: आलापल्ली वन विभागाअंतर्गत येत असलेल्या वन परिक्षेत्र पेंडीगुडम स्थित मुलचेरा उपक्षेत्र गोमणी, मुखडी टोला खंड क्र. १३२ मध्ये मौल्यवान सागवान झाडांची अवैद्य वृक्षतोड कत्तल करुन सदर अवैद्य मौल्यवान साग वृक्षतोड करणा-याला मदत करणाऱ्या वनरक्षक, क्षेत्रसहाय्यक, वन परिक्षेत्र अधिकारी यांचेवर विभागीय कार्यालयामार्फत चौकशी करुन निलंबनाची कार्यवाही करण्याबाबत. अन्यथा येणारे काही दिवसात बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल.
मा. महोदय,
सविनय विनंती याप्रमाणे आहे की, आलापल्ली वन विभागाअंतर्गत येत असलेल्या वन परिक्षेत्र पेंडीगुडम स्थित मुलचेरा उपक्षेत्र गोमणी, मुखडी टोला खंड क्र. १३२ या नियत क्षेत्रामध्ये कित्येक वर्षापासून सागाचे झाडांचे अवैद्य वृक्षतोड होत आहे. त्या क्षेत्राचे वन परिक्षेत्र अधिकारी, क्षेत्रसहाय्यक, वनरक्षक यांनी सागवान झाडांचे अवैद्य वृक्षतोड करणाऱ्यासोबत संगनमत करुन स्वतःच्या लाभापोटी कित्येक मौल्यवान सागवान झाडांचे वृक्षतोड केलेले आहे.
मी स्वतः नियत क्षेत्रामध्ये भेट दिली असता प्रचंड मोठ्या प्रमाणात अवैद्य वृक्षतोड झालेले आढळून आल्यानंतर मी त्या गावाच्या आजूचाजूच्या गावकऱ्यांशी चर्चा केली असता त्यांचे म्हणणे होते की, कित्येक वर्षांपासून हे मौल्यवान सागवानाचा तोड करीत असल्याबाबत व यामध्ये त्या क्षेत्राचे वनरक्षक यांची त्यांच्यासोचत मिलीभगत असल्यामुळे हे सगळे प्रकरण होत आहे.
मा. महोदय, कित्येक वर्षापासून सागाचे झाडांचे अवैद्य वृक्षतोड असल्याबावत त्या क्षेत्राचे क्षेत्रसहाय्यक, वनरक्षक यांना साग झाडांचे वृक्षतोडबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती सुध्दा दिलेली नाही. तसेच अवैद्य वृक्षतोड बाबत POR सुध्दा केलेला नाही. हे सर्व वृक्षतोड बाबत १०० टक्के
माहिती असतांना सुध्दा स्वतःच्या लाभापोटी सागवान झाडांची वृक्षतोड करणाऱ्यासोबत क्षेत्र सहाय्यक, वनरक्षक यांची आपण स्वतः तपासणी करुन चौकशी करुन फौजदारी व दंडात्मक कार्यवाही करुन सदर कार्यवाहीची संपूर्ण चौकशी अहवाल देण्यात यावी. अन्यथा येणारे काही दिवसात बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल.
करीता माहितीस व उचित कार्यवाहीस सविनय सादर.
टिप : खंड क्र. १३२ मध्ये वृक्षतोड झालेल्या खोडावर ११ ला गोल करुन २०२५ असे लिहिलेले दिसून येत आहे याचा अर्थ गावकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना असे वाटले पाहिजे को, हे POR केलेले आहे पण असे काही झालेले नाही. क्षेत्र सहाय्यक, वनरक्षक यांच्या संगनमताने कोटयावधी रुपयाचे मौल्यवान सागवान वृक्षांची तोड केल्याने शासनाचा महसूल बुडालेला आहे. असेच प्रकारे मुखड़ी आणि मुखडी टोला या नियत क्षेत्रात बिट निरीक्षण केल्यास कोटयावधीचे अवैद्य वृक्षतोड केल्याचे आढळून येईल. अशा भ्रष्ट वनपाल, वनरक्षक यांना तात्काळ निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शंकर डोलगे यांनी पत्रकातून केली आहे.
ठिकाण : आलापल्ली
दिनांक: २१/०५/२०२५
सहपत्र: यासोबत अवैद्य वृक्षतोडाची फोटोकॉपी
