मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.
*अहेरी:-* ऊपविभागात प्रलंबीत असलेली समस्या म्हणजे जमिनीचे पट्टे. कित्येक पुढारी येतात आश्वासने देतात मात्र प्रत्यक्षात भुमिहीनांच्या हाती काही लागत नाही. या भागात जबरनजोतचे पट्टे, गावठाण क्षेत्रातील पट्ट्यांची समस्या मोठ्या प्रमाणात आहे तसेच बर्याच गावात रेती अभावी घरकुल परत चालले त्याकडे अहेरी विधानसभा क्षेत्रातील भाजप पदाधिकार्यांनी राज्याचे महसुलमंत्री श्री चंद्रशेखर बावणकुळे यांचे लक्ष वेधले असता यासाठी महायुती शासनाने पट्ट्यांसदर्भात बरेच महत्वपुर्ण विषयांवर वेगाने निर्णय घेतलेले असल्याचे सांगितले. अवघ्या काही कालावधीत याभागातील महसुल संदर्भातले सर्वच समस्या निकाली काढू अशी ग्वाही दिली. शहरी भागात आखीव पत्रीका देण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आल्याचे सुध्दा त्यांनी सांगीतले.
या प्रसंगी अहेरी विधानसभा क्षेत्रातील भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी ऊपस्थित होते.

