माजी जि. पं. अध्यक्ष अजय कंकडावार व पं. स. माजी उपसभापती सोनालीताई अजय कंकडालवार यांची मंडळाला आवर्जून भेट.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
*अहेरी ( कोत्तूर रोड )*
आदर्श शारदा उत्सव मंडळ कोत्तूर रोड अहेरी कडून दरवर्षी प्रमाणे यंदाही माता शारदा देवीची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापणा केली आहे.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यामन संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार आणि काँग्रेसचे नेत्या व अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौ.सोनालीताई अजय कंकडालवार यांनी मंडळाला भेट देऊन,
माता शारदा देवीची विधिवात पूजा अर्चना करून दर्शन घेतली.तसेच त्यावेळी अजय कंकडालवार यांनी सर्वांना विजयादशमी व दसऱ्याची शुभेच्छा दिल्या,तसेच कंकडालवारांनीमंडळाला वर्गणीही देण्यात आली.
यावेळी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

