कार्यक्रमाचे अंचल अध्यक्ष रविभाऊ नेलकुद्री यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम मोठया उत्सहात साजरा.
मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.
*आलापल्ली ==*
दिनांक 02/10/2025 ला विजयादशमी ( दसरा ) चे औचित्य साधून एकल अभियान अंचल आलापल्ली व दानशूर चा राजा गणेश मंडळ अहेरी यांच्या सौजन्याने दसरा मोउत्सवाला येणाऱ्या सर्व भक्तांना व जनसागराला भव्य असा अन्नदान(भोजन )कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमात अंचल अध्यक्ष रवीभाऊ नेलकुद्री यांच्या मार्गदर्शनाखाली रेणुकाताई कंचकटले संभाग गतिविधि प्रमुख,एकल अभियान अंचल आलापल्ली चे अभियान प्रमुख महेश बुरमवार, संजू चौधरी, कोमराय्या तलांडी.व इतर पुर्णवेळ सामाजिक कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते. अहेरी परिसरातील दसरा उत्सवातील हजारो भक्तांनी या महाप्रसादाचा आस्वाद मोठया आनंदात घेतला. एकल अभियान अशा सामाजिक उपक्रमात नेहमी अग्रेसर असतात. हे मात्र निश्चित.

