गडचिरोली जिल्ह्यातील बंगाली समाजाच्या जमिनी वर्ग एक करणे बाबत व चामोर्शी तालुक्यात सुरू असलेल्या भूमी अधिग्रहण बाबत सविस्तर चर्चा.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
*चामोर्शी ==*
दिनांक 6 ऑक्टोबर 2025 चामोर्शी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे राष्ट्रीय मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रणय भाऊ खुणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी अरुण एम यांची राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा गडचिरोली अध्यक्ष रमेश अधिकारी व चामोर्शी तालुका सचिव संतोष बुरांडे यांनी सदिच्छा भेट घेतली व चामोर्शी तालुक्यातील औद्योगिक विकास कार्यक्रम अंतर्गत होत असलेल्या भुमिअधिग्रहण बाबत सविस्तर चर्चा करून माहिती जाणून घेतले यावेळी भूमी अधिग्रहण मधे समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांच्या बाजूने मिळत तोकडया रकमे बाबत राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने विषय मांडला व भूमी अधिग्रहण होत असलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा बाबत चर्चा केली व प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी व मूलचेरा तालुक्यातील बंगाली समाजाचे विविध गावातील सर्व सामान्य नागरिकांना पुनर्वसन वाटप अंतर्गत मिळालेल्या जमिनीचे वर्ग एक मध्ये रूपांतरण करण्याबाबत चर्चा झाली यावेळी सर्व विषयावर उपविभागीय अधिकारी यांनी अरुण एम. यांनी सकारात्मक चर्चा केली व आलेल्या अडचणी बाबत आपण केव्हाही समस्या सोडण्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत असे आश्वासन दिले व आपण व राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने मागितलेले सर्व माहिती संघटनेला पुरवण्यात येईल व वेळोवेळी सर्व सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन दिले याबद्दल राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा गडचिरोलीचे व तालुका चामोर्शीचे वतीने नवनियुक्त उपविभागीय अधिकारी अरुण एम यांचे आभार व्यक्त आले आहे

