विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी मोबाईल नो. 9421856931
*एटापल्ली==*
आज दि.15 ऑक्टोबर 2025 रोजी भारताचे माजी राष्ट्रपती व महान शास्त्रज्ञ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती संपूर्ण भारतात ‘‘वाचन प्रेरणा दिवस” म्हणून साजरा केला जातो या दिवसाचे औचित्य साधून गडचिरोली पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून ‘‘एक गाव एक वाचनालय’’ अंर्तगत पोलीस मदत केंद्र, हेडरी येथील सार्वजनिक वाचनालयात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी व जिपो अंमलदार तसेच गावातील नागरिक हे सकाळी 11.00 ते 12.00 या कालावधीत ‘‘एक तास वाचनाकरिता’’ या शिर्षकाखाली सार्वजनिक वाचनालय याठिकाणी सामूहिक वाचन करण्यात आले.
तसेच यशोरथ स्पर्धा परीक्षा टेस्ट सिरीज मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने पेपर क्र. 09 चे सार्वजनिक वाचनालय येथे 12.00 ते 13.30 वा. पर्यंत सराव पेपर घेण्यात आले. सराव पेपर करिता हद्दीतील 07 विध्यार्थी हजर होते.
तसेच राष्ट्रीय सायबर जागरूकता अभियान या उपक्रमांतर्गत विनोबा आश्रम शाळा, Hedari येथे सायबर गुन्ह्याबद्दल जनजागृती माहिती या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यात विद्यार्थ्यांना cyber गुन्ह्याबद्दल मार्गदर्शन केले. सोशल मीडियाचे विद्यार्थी जीवनामध्ये अध्ययन करताना प्रभावीपणे कसा वापर करावा व व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, या मोबाईल ॲपद्वारे होणारी ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडियाचा वापर करतांना घ्यावयाची काळजी जेणेकरून आपले सोशल मीडिया अकाउंटचे गैरवापर होणार नाही याची आपण काळजी कशी घ्यावी याबाबत माहिती देऊन सविस्तर मार्गदर्शन करून त्यापासून सावध राहण्याबाबत माहिती देण्यात आली. तसेच केंद सरकारने सुरू केलेल्या हेल्प लाईन नंबर 1930, 1945 याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच नवीन कायदे भारतीय न्याय संहिता व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या कायद्याब

