कार्यक्रमामध्ये माजी जि. पं. अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार यांची भेट.
मधुकर गोंगले उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
*आलापल्ली*
आलापल्ली येथील दरवर्षी प्रमाणे यंदाही दिवाळी व लक्ष्मीपूजन शुभमुहूर्तावर श्री.महालक्ष्मी महिला लखमाई मंडळ आलापल्ली कडून *लखमाई भुलाई* मातेची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे.मंडळकडून मातेची पूजा कार्यक्रम आयोजित करण्यात आली होती.
आयोजित पूजा कार्यक्रमला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जि.प.अध्यक्ष तथा विद्यमान संचालक *मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार* तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव *मा.श्री.हणमंतू मडावी* साहेबांनी उपस्थित दर्शवून मातेची विधिवात पूजा अर्चना करून मातेची दर्शन घेतली.
त्यावेळी अजय कंकडालवारांनी देवीच्या चरणी नतमस्तक होऊन गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना करण्यात आले आहे. तसेच येथील विविध समस्या जाणून घेतली.
यावेळी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक,मंडळाचे महिला पदाधिकारी,सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

