मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
*चंद्रपूर==*
चंद्रपूर जिल्ह्यात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी संघटन काँग्रेस पक्ष अधिकाधिक मजबूत करण्यासाठी, गटबाजी दूर करण्यासाठी माजी खासदार नरेशबाबू पुगलिया याच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात यावी अशी मागणी सुरेश भाऊ श्रीवासकर उपाध्यश जिल्हा काँग्रेस सेवादल तथा जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रीय मजदुर काँग्रेस चंद्रपूर करंजी च्या वतीने मागणी करण्यात आली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांनी काँग्रेस पक्षासाठी अहोरात्रौ नेहनत घेऊन आजही काँग्रेस पक्षात एकनिष्ठ पणे खंबीर पणे उभे आहेत.
तसेच यांचे कार्यकाळात अनेक विकास कामे करण्यात आले आहे असा दावा करून चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेतृत्व पुगलीया यांना देण्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.

