📰
मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.
अहेरी तालुका –
मौजा छल्लेवाडा येथे आज मोठी राजकीय उलथापालथ घडली आहे. छल्लेवाडा गावातील प्रमुख नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) मध्ये प्रवेश करण्यात आले आहे.
या प्रवेश सोहळ्यात किष्ठू बोरकर, राजाराम दुर्गे, तिरुपती दुर्गे, शंकर दहावगावकर, लक्ष्मण जुमडे, तुकाराम बोरकर, तुकाराम जुमडे, देवाजी जुमडे, दिवाकर जुमडे, कमलाकर जगजंपुला, दिवाकर वनकर, प्रभाकर वनकर, जिवन भसारकर, व्येंकटी बोरकर, आनंदराव दुर्गे आणि गणपती डोंगरे या नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) मध्ये प्रवेश केला.
या कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्या उपस्थितीत सर्वांनी पक्षाचा झेंडा स्वीकारला. या वेळी कार्यकर्त्यांनी भाग्यश्रीताई यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून पक्षबांधणीसाठी सक्रिय योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.
सध्या जिल्हा परिषद निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना, छल्लेवाडा गावातील हा पक्ष प्रवेश करण्यात आले आहे. विविध पक्षातील पक्षानां यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या १५ ते २० वर्षांपासून छल्लेवाडा हा गाव मजबूत गड म्हणून ओळखला जात होता, परंतु आता या प्रवेशामुळे त्या गडात मोठे भगदाड पडल्याची चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात रंगली आहे.

