.हनिशा दुधे चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी मो. नं.9764268694
बल्लारपूर/चंद्रपूर:
बामणी-वरोरा या ‘मृत्यू महामार्गा’ वरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघाती मृत्यूंना केवळ ‘खड्डे’ नव्हे, तर टोल कंत्राटदार ‘विश्वराज कॉन्ट्रॅक्शन कंपनी’चे गुन्हेगारी निष्काळजीपण जबाबदार आहे, असा थेट आरोप आम आदमी पार्टी (AAP), बल्लारपूरने केला आहे. कोट्यवधींचा टोल वसूल करणाऱ्या, पण जनतेच्या जिवाला धोका निर्माण करणाऱ्या कंपनीच्या धोरणाविरुद्ध ‘आप’ संतप्त झाली आहे. ‘आप’चे शहर अध्यक्ष रवि पुप्पलवार यांनी आज (दि. ३१ ऑक्टोबर २०२५) मा. पोलीस अधीक्षकांना लेखी तक्रार देऊन, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि प्रकल्प व्यवस्थापकांवर भादंवि कलम ३०४-अ (निष्काळजीपणामुळे मृत्यू) अंतर्गत तात्काळ FIR दाखल करण्याची मागणी केली आहे. PWD तर्फे वारंवार नोटीस देऊनही निकृष्ट आणि तात्पुरती मलमपट्टी करून कंपनीने निष्पाप नागरिकांच्या जीवाशी खेळ केला आहे. हा केवळ प्रशासकीय दुर्लक्ष नसून, दंडनीय अपराध असल्याचे ‘आप’चे मत आहे. “केवळ कंपनीच नाही, तर दुर्लक्ष करणारे सरकारी अधिकारी आणि डोळे झाकून बसलेले शासनदेखील या मृत्यूंना जबाबदार आहे. जर प्रशासनाने तातडीने FIR दाखल करून रस्ता दुरुस्ती सुरू केली नाही, तर ‘आप’ जनतेला सोबत घेऊन ‘टोल बंद आंदोलन’ सुरू करेल!”
प्रत्येक अपघातासाठी कंपनीचे CEO आणि प्रकल्प प्रमुखांना थेट जबाबदार धरले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पीडितांना न्याय देण्याची मागणी केली आहे.
निवेदन देतेवेळी शहर अध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांच्यासह उपाध्यक्ष अफजल अली, संघठन मंत्री रोहित जंगमवार, सलमा सिद्दिकी, अजयपाल सूर्यवंशी, स्नेहा गौर, गीत उमरे, सौरभ चौहान, सुभाष साव व इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

