मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील ताडगाव वार्ड नं १६ मध्ये चिकन दुकानाआड दारूविक्रीची बाब उघडकीस आली. याप्रकरणी पोलिस व मुक्तीपथ टीमने संयुक्तरीत्या 4 हजार रुपये किमतीची देशी दारू जप्त करीत सदर विक्रेत्यावर गुन्हा दाखल केला आहे.
ताडगाव वार्ड नं १६ मध्ये चिकन विक्री दुकानाच्या आड देशी दारू विक्री केल्या जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे पोलिस व मुक्तीपथ टीमने संबंधित दुकानात धाड टाकून तपासणी केली असता, 4 हजार रुपये किमतीची देशी दारू मिळून आली. पोलिसांनी पंचनामा करून संबंधित विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे शहरातील इतर विक्रेत्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. ही कारवाई ताडगाव पोलिस मदत केंद्राचे पोलिस निरीक्षक रंजीत म्हस्के व पोलिस पथकाने केली. यावेळी मुक्तीपथ तालुका संघटक निळा किन्नाके, उपसंटक भुपेंद्र सडमेक व ग्रामस्थ उपस्थित होते.

