विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी.
मो. नं. 9421856931.
एटापल्ली ==
एक्सपायर वस्तूंची विक्री, वर्षभर फटाक्यांचा व्यवसाय आणि लायसन्सचा उघड गैरवापर
विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी मोबाईल 9421856931
एटापल्ली | प्रतिनिधी
एटापल्ली शहरातील “शुब्रत किराणा अँड जनरल स्टोअर्स” या दुकानावर विविध प्रकारच्या गैरव्यवहारांचे आणि नियमभंगाचे गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दुकानात एक्सपायर (कालबाह्य) झालेल्या वस्तूंची विक्री केली जात असून, ग्राहकांना पक्के बिल न देणे, जीएसटी क्रमांकाचा वापर न करणे अशा प्रकारच्या अनियमितता मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
याशिवाय, या दुकानाकडून वर्षभर फटाक्यांची विक्री केली जाते, असा धक्कादायक आरोप समोर आला आहे. फटाके विक्रीसाठी शासनाकडून स्वतंत्र परवाना आवश्यक असतो, मात्र जनरल स्टोअर्सच्या परवान्यावर फटाक्यांची विक्री करणे हा स्पष्ट नियमभंग आहे. त्याचप्रमाणे, जनरल स्टोअर्सच्या परवान्याखाली किराणा मालाची विक्री कशी केली जाते, हा देखील गंभीर प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. व्यवसायिक लायसन्सचा अशा प्रकारे गैरवापर करून दोन वेगवेगळ्या व्यवसायांची बेकायदेशीररीत्या विक्री केली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या प्रकारामुळे स्थानिक ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, संबंधित दुकानाविरोधात तत्काळ चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अशा बेकायदेशीर व्यवसायामुळे ग्राहकांच्या आरोग्य आणि सुरक्षेवर धोका निर्माण होऊ शकतो, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
ग्राहक संघटनांनी नागरिकांना सावधगिरीचा सल्ला देत खरेदी करताना वस्तूंची वैधता (expiry date) तपासावी, पक्के बिल घ्यावी.

