पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनीधी…
वानवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर
पुणे : दि. २९/०९/२०२२ रोजी रामटेकडी हडपसर पुणे येथील अण्णाभाऊ साठे उद्यान येथे इसम नामे फिर्यादी व त्यांचे नातेवाईक असे गप्पा मारत बसलेले असताना तेथेच राहणारे बंटी निकाळजे, चिक्या भडके, अनिकेत सोनवणे, सुमित शिंदे, मोनु शेख व दोन विधि संघर्षीत बालक यांनी फिर्यादी व त्यांचे नातेवाईक यांना लोखंडी तलवार व चाकुने मारहाण करून त्यांचे कडील मोबाईल हॅन्डसेट जबरदस्तीने हिसकावुन घेवुन निघुन गेले होते. म्हणुन त्यांचे विरुध्द फिर्याद दिल्याने वानवडी पोलीस ठाणे येथे सदर बाबत गु.र.नं. ४१२/२०२२, भा.दं.वि. कलम ३९७, ३९४ ३२६ ३२३, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ भारतीय शस्त्र अधि कलम ४(२५) २७.३५ सह महाराष्ट्र पोलीस अधि कलम ३७ (१) (३) सह ५३५. क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
समुद्र गुन्हयातील पाहीजे आरोपी यांचा वानवडी पोलीस ठाणे येथील तपास पथकातील अधिकारी सपोनि जयवंत जाधव व पोउनि अजय भोसले तसेच तपास पथकातील अंमलदार हे वरिष्ठांचे आदेशाप्रमाणे सुचनां प्रमाणे शोध घेत असताना त्यांना मिळालेल्या बातमीवरून व तांत्रीक विश्लेषणावरुन आरोपींचा शोध घेवून यातील आरोपी व विधिसंघर्षित बालक यांना १२ तासांचे आत आरोपींचा अहोरात्र शोध घेवून अत्यंत परिश्रमपूर्वक व शिताफीने पकडले असून त्यांचेकडे उकृष्टरित्या तपास करुन त्यांनी यातील फिर्यादी व साक्षीदार यांना जबर मारहाण करणेसाठी वापरलेली लोखंडी तलवार व गुप्तीसारखा चाकु हे जप्त केले असून, आरोपींनी व विधिसंघर्षीत बालक यांनी यातील साक्षीदार यांचे जबरदस्तीने हिसकावून नेलेले अंदाजे १,००,०००/-रु. कि.चे एकुण चार मोबाईल हॅन्डसेट है ही त्यांचे कडुन जप्त करण्यात आलेले आहेत. दाखल गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उप निरिक्षक अजय भोसले हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही श्रीमती नम्रता पाटील पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-५ पुणे शहर व श्रीमती पौर्णिमा तावरे सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री दिपक लगड, पोलीस निरिक्षक (गुन्हे) श्री. संदिप शिवले व तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, पोलीस उप निरिक्षक अजय भोसले, पो.अम. अमजद पठाण, विनोद मंडलकर, अतुल गायकवाड, सर्फराज देशमुख, महेश गाढवे, राहुल गोसावी, निलकंठ राठोड, संदीप साळवे व विष्णु सुतार यांनी केली आहे.

