मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
अहेरी तालुक्यातील किष्टापूर वेल येथील रहिवाशी इनदरशा नैताम हे वृदपकाळाने निधन झाल्याची बातमी कार्यकर्त्यांकडून मिळाली असता?
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी नैताम कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.
दरम्यान नैताम परिवार गरीब असून होणाऱ्या अंत्यविधी कार्यक्रमला अडचण बसत असल्याची माहिती उपस्थित गावकरी व कार्यकर्त्यांनी अजय कंकडालवार यांचा कानावर पडून दिल्याने एक हात पुढे करत सामाजिक बांधलीकी जपत,पुढाकार घेत नैताम परिवाराला होणाऱ्या कार्यक्रमला आर्थिक मदत केले आहे.
नैताम परिवारास या दुःखातून सावरण्याची हिम्मत देवो अशी ईश्वरास प्रार्थना केले.तसेच कंकडालवार सांगितले की’यापुढेही कोणत्याही कामासाठी आपण माझा संपर्कात रहा मी आपल्याला शक्य तो मदत करेन म्हणून नैताम कुटुंबियांना मोठा धीर दिला.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती गीता चालूरकर,नरेश मडावी सरपंवच किस्टापूर वेल,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,हरिदास आत्राम, प्रवीण रेषे यांच्यासह स्थानिक काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

