नवनीत ग्राम पहाडीच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना नेहमी कटिबद्ध!
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
दिनांक 11 जानेवारी 2026
घोट रेगडी हळदवाही व जिल्हा परिषद क्षेत्रातील नवनीत ग्राम पहाडी येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या नवनीत ग्राम शाखेद्वारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष डॉ,प्रणय भाऊ खुणे, प्रमुख पाहुणे मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष नानु भाऊ उपाध्ये, विदर्भ केसरी वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधी फुलचंद वाघाडे,संदीप भोवरे, प्रवीण गेडाम व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी अध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी प्रत्येकाने पुढे सरसावले पाहिजे, व राष्ट्रसंताच्या विचाराची आज देशाला गरज आहे सांगितले, यावेळी गुरुदेव भक्त आयोजकांनी येथील विविध समस्या मांडल्या व नवनीतग्राम पहाडीच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना कटिबद्ध आहे असे प्रतिपादन केले व सर्वात आधी या पर्यटन स्थळाला ( क )वर्ग दर्जात आणणे गरजेचे आहे असे सांगितले यावेळी श्री गुरुदेव भक्तांसोबत डॉ. प्रणय भाऊ खुणे यांनी पहाडीची पाहणी केली व सोयी सुविधेचा आढावा घेतला व येथील विकासाबाबत गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद भाऊ नरोटे व वनपरिक्षेत्राधिकारी वाडीघरे साहेब यांच्यासोबत भ्रमणध्वनीवर सविस्तर चर्चा केली यावेळी डॉ. खुणे यांच्या हस्ते येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याचे जागेचे उद्घाटन करण्यात आले, श्री गुरुदेव सेवा मंडळचे विश्वस्त नोनीगोपाल हलदर व नवनीतग्राम पहाडी व ग्रामपंचायत हळदवाही अंतर्गत विविध गावातील गुरुदेव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

