मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
पंचायत समिती अहेरी च्या राजाराम केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमलगुडम येथे अतिरिक्त शिक्षक नेमणूक करा अशी आशयाचे निवेदन अहेरीचे गट शिक्षण अधिकारी सुनिल आईंचवार यांच्याकडे शाळा व्यवस्थापन समिती यांनी दिले आहे.
राजाराम केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमलगुडम येथे एक ते चार वर्ग असून एक शिक्षक कार्यरत आहेत त्यांच्याकडे मुख्याध्यापक पद व चार वर्गांना अध्यापन आहे.
शालेय कामासाठी मुख्यध्यापक गेले तर शाळा बंद करून गेल्याशिवाय पर्याय नाही
शालेय कामे जसे की मिटिंग असेल केंद्र शाळेत किंवा पंचायत समिती असो की गट साधन केंद्र किंवा शालेय अन्य कामे असेल तर
शालेय कामासाठी मुख्यध्यापक गेले तर शाळा बंद करून गेल्याशिवाय पर्याय नाही
परिणामी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात नुकसान होत आहे म्हणून नियमितपणे शाळा व दैनंदिन शाळा सुरू राहण्याकरिता निदान कंत्राटी शिक्षक तरी उपलब्ध करून द्याल अशी आशयाचे मागणीचे निवेदन शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष रमेश बामनकर, माजी अध्यक्ष नागेश शिरलावार, माजी पंचायत समिती सदस्य गंगाराम आत्राम,उपाध्यक्ष अशोक कोडापे, सदस्य राकेश सोयाम, दिलीप मेश्राम, राकेश बामनकर, सुरेश बामनकर,विकेश शिरलावार, श्यामला सडमेक,शिल्पा पोरतेठ आदी पालक वर्ग केले आहे.

