मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
धानोरा
दिनांक 26/1/2026 ला जि. प. उच्च प्राथ. केंद्र शाळा दूधमाळा, पल्लवी विद्यालय, ग्रामपंचायत, मुख्य चौक, सोसायटी व पाटील चौक येथील ध्वजारोहणानंतर जि प. उच्च प्राथ. केंद्र शाळा दूधमाळा व ग्रामपंचायत च्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रम,विद्यार्थ्यांचे कवायत, मनोरे व लेझीम नृत्य घेण्यात आले व ग्रामपंचायत भवन नवीन इमारतीच लोकार्पण करण्यात आला.
दूधमाळा या गावावर विशेष प्रेम असल्याने भाजपा जिल्हा सचिव मा. सारंगजी साळवे यांनी ग्रामपंचायत भवन निर्मणासाठी विशेष प्रयत्न करून काम खेचून आणले व त्यांच्या हस्तेच भूमी पूजन करण्यात आलं होतं b लोकार्पण सुद्धा त्यांच्याच हस्ते करण्यात आले
सदर लोकार्पण सोहळ्यास गट विकास अधिकारी, ग्रामसचिव, शाळा मुख्याध्यापक, आणि सारंगजी साळवे जि. सचिव भाजपा, विनोदजी लेनगुरे माजी जि. प. सदस्य, राजू जिवानी मा. जि प. सदस्य, मायाताई उसेंडी सरपंच, यशवंत मा. मोहुर्ले उपसरपंच, राकेशजी उईके शा. व्य. स. अध्यक्ष,हे उपस्थित होते
शालेय विद्यार्थ्यांचे भाषण, मान्यवरांचे मार्गदर्शन झाले कार्यक्रमाचे संचालन बारसिंगे सर यांनी केले व आभार काळे सर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यश्वितेसाठी शाळा, ग्रा पं. व व गावातील युवा, महिला व सर्व गावकरी यांनी सहकार्य केले

