माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांची आंदोलन स्थळी भेट.
विश्वनाथ जांभुळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी क्र 9421856931
*एटापल्ली-:* तालुक्यातील एटापल्ली–देवदा–गडचिरोली, एटापल्ली–जारावंडी तसेच एटापल्ली–हेडरी–गट्टा या मुख्य मार्गांची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने बेमुद्दत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
या आंदोलनाला अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांनी भेट देत,आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली.
एटापल्ली तालुका दौऱ्यावर असताना राजे साहेब यांनी उपोषण स्थळी जाऊन पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मागण्या शांतपणे ऐकून घेतल्या.संबंधित रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेता नागरिकांना ये-जा करण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब यावेळी मांडण्यात आली.
त्यावेळी राजे साहेब यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी तातडीने चर्चा करून रस्त्यांच्या दुरुस्ती व कामाबाबत लवकर निर्णय घेण्यात येईल,असे आश्वासन दिले.
या प्रसंगी युवा नेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम,भाजपा जिल्हा सचिव मोहन नामेवार,उपसरपंच प्रशांत आत्राम तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
