अजयभाऊ कंकडालवार यांची. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे महासचिव म्हणून त्यांनी राजकारणाला केवळ सत्तेचा मार्ग न मानता जनसेवेचे माध्यम मानले आहे.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
*अहेरी विधानसभा:- “जनसेवा हीच माधव सेवा”* हा त्यांचा जीवनमंत्र आहे.शेतकऱ्यांच्या अडचणी असोत, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची धडपड असो किंवा गोरगरिबांच्या घरातील समस्या अजयभाऊ प्रत्येक ठिकाणी ठामपणे उभे राहतात.शेतकऱ्यांना न्याय,विद्यार्थ्यांना संधी आणि सामान्य माणसाला आधार देणे, हेच त्यांचे ध्येय.शिक्षणसेवा,समाजसेवा आणि विकासकामे यांचा सुंदर संगम त्यांच्या कार्यात दिसून येतो.राजकारणात कितीही संकटे आली,विरोधकांनी कितीही अडथळे निर्माण केले तरी जनतेची साथ आणि विश्वास हेच त्यांचे खरे बळ आहे. त्यांनी जिल्हा परिषदेत अध्यक्षपद भूषवताना विकासकामांची गती वाढवली, पारदर्शक कारभार केला आणि सर्वसमावेशक नेतृत्वाची छाप पाडली. म्हणूनच आजही कार्यकर्ते आणि नागरिकांच्या मनात एकच अपेक्षा आहे पुन्हा एकदा जिल्हा परिषद निवडणुकीत अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष म्हणून अजयभाऊंच्या नेतृत्वाखाली विकासाची पताका फडकावी.
अजयभाऊ कंकडालवार हे केवळ राजकीय नेते नाहीत,तर जनतेच्या हक्कासाठी लढणारे,अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे आणि विकासाची नवी दिशा देणारे नेतृत्व आहेत.त्यांची जिद्द,चिकाटी आणि लोकांप्रती असलेली निष्ठा यामुळेच ते सर्वांच्या मनात आदराचे स्थान मिळवतात.

