लेखक शिक्षक रामगोपाल अट्टेला लिहिलेला अप्रितम लेख.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
आज भारत एकविसाव्या शतकात प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत असताना स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. प्राचीन काळापासून कुटुंब संस्थेत स्त्रीची, विशेषतः आईची भूमिका अत्यंत जबाबदारीची आणि महत्त्वाची राहिली आहे. कुटुंब म्हणजे आई, वडील आणि मुले यांनी बनलेली व्यवस्था, जिथे घराचा प्रमुख जरी वडील असले तरी मुलांच्या संगोपनाचा भार आईच उचलते.
संस्कारांची पहिली गुरु
मुलांचे पालन-पोषण करण्यापासून ते त्यांना मोठे होईपर्यंत चांगले-वाईट समजावून सांगण्याचे काम आई करते. मुलाला प्राथमिक शिक्षण आईकडूनच मिळते, म्हणूनच आईला पहिले गुरु मानले जाते. स्त्री ही खऱ्या अर्थाने कुटुंब संस्थेचा कणा आहे.
सामाजिक वास्तव आणि *स्त्री-पुरुष समानता*
आजच्या काळात स्त्री भ्रूणहत्येचे प्रमाण वाढणे ही समाजाला कलंक लावणारी गोष्ट आहे. २०११ च्या जनगणनेनुसार दर १००० पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण केवळ ९३३ आहे. जर समाजात मुलगा आणि मुलगी असा भेद केला, तर प्रगती होणे कठीण आहे. जगातील कोणताही बलवान किंवा बुद्धिमान पुरुष हा एका स्त्रीच्या पोटीच जन्म घेतो. ‘स्त्री’ ही सृष्टीची जननी आहे आणि तिच्याशिवाय मानवी जीवनाचा विस्तार होणे अशक्य आहे.
*स्त्रीची बहुविध भूमिका*
पुरुषप्रधान संस्कृतीमुळे आजही अनेक ठिकाणी स्त्रीला दुय्यम स्थान दिले जाते, पण ही स्थिती बदलणे गरजेचे आहे. स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षाही अधिक सहनशीलता असते. ती आई, बहीण, पत्नी आणि मुलगी अशा विविध भूमिकांमधून कुटुंबावर प्रेमाचा वर्षाव करते आणि सर्वांना सन्मार्गाकडे नेते.
आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना असे म्हणावेसे वाटते की—
”सात पिढ्या जन्म घेईन आई तुझ्याच पोटी, तू ज्या जीवनात नाही ते जीवन अंधार कोठडी”
आपल्याला ध्येय पाहण्यास आणि जीवन जगण्यास शिकवणाऱ्या प्रत्येक मातेला माझे लाख लाख धन्यवाद… सर्व महिलांना *आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या* हार्दिक शुभेच्छा.
*शुभेच्छुक*=लेखक, शिक्षक रामगोपाल अट्टेला एम,ए, बी, एड.कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सिरोंचा.

