Thursday, May 21, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त आरेंदा येथे महिला दिन मोठया उत्साहात साजरा.

Madhukar gongale by Madhukar gongale
March 9, 2026
in Uncategorized
0 0
0
आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त आरेंदा येथे महिला दिन मोठया उत्साहात साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.

अहेरी ==

ग्रामपंचायत आरेंदा येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या योगदानाचा सन्मान, त्यांचे सशक्तीकरण आणि समाजातील त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश महिलांचा सहभाग वाढवणे, आरोग्य व पोषणाबाबत जनजागृती करणे तसेच गावातील ऐक्य आणि सहकार्याची भावना दृढ करणे हा होता. तसेच २०२६ हे वर्ष “आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष” म्हणून साजरे करण्यात येत असल्याने महिला शेतकऱ्यांच्या भूमिकेवर विशेष भर देण्यात आला.

*हा कार्यक्रम दिनांक ०७/०३/२०२६ आणि ०८/०३/२०२६ रोजी दोन दिवस विविध उपक्रमांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला. ०७/०३/२०२६ रोजी पर्यावरण संवर्धन व ग्रामस्वच्छतेचा संदेश देण्यासाठी वृक्षलागवड, ग्राम स्वच्छता अभियान तसेच लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. या उपक्रमांमुळे गावातील नागरिक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.*

०८/०३/२०२६ रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या दिवशी महिला सशक्तीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी गाव रॅली, रांगोळी स्पर्धा, लहान मुलांचे नृत्य सादरीकरण, चमचा-गोळी खेळ, म्युझिकल चेअर स्पर्धा तसेच पोषण आहाराबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. विविध स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षीस वितरण करून गौरविण्यात आले. या सर्व उपक्रमांमुळे महिलांमध्ये, मुलांमध्ये व ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

यावर्षी “आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष” म्हणून साजरे करण्यात येत असल्याने कृषी विभागामार्फत महिला शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती उपस्थित महिलांना देण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान कृषी विभागाच्या कु. दीक्षा नैताम यांनी मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून पोकरा (POCRA) योजना तसेच कृषी विभागातील विविध शेतकरी कल्याणकारी योजना यांची माहिती दिली. तसेच कु. संज्योत सरोडे यांनी महिलांसाठी उपलब्ध असलेल्या विविध योजनांचा परिचय करून देत महिला बचत गटांसाठी चिकी तयार करण्यासंबंधी उपक्रम, ट्रॅक्टर व कृषी अवजारे अनुदान योजना, बी-बियाणे व खत अनुदान योजना, शेती यांत्रिकीकरण योजना तसेच महिला शेतकऱ्यांसाठी शासनाच्या इतर लाभदायी योजनांची माहिती महिलांना दिली. या मार्गदर्शनामुळे उपस्थित महिलांना शेती व उपजीविकेच्या विविध संधींबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.

*या कार्यक्रमास कृषी विभागाच्या कु. दीक्षा नैताम व कु. संज्योत सरोडे, श्री. मंगेश कुडे (टीम लीडर, BAIF), श्री. व्यंकटेश तलांडी (सरपंच), सौ. बिज्जू आत्राम (उपसरपंच), श्री. एस. झाडे (ग्रामसेवक), श्री. तुळशीराम आत्राम (ग्राम रोजगार सेवक), श्री. के. जी. मुंजमकर (मुख्याध्यापक), श्री. एस. पी. मडावी (शिक्षक), कु. विद्या वाळको (MT), कु. सायली मेश्राम (GI), सौ. माधुरी कन्नाके (GRP), सौ. ज्योती तलांडे (GRP), श्री. विशाल आलम (GRP), श्री. बाबुराव तलांडी (CRP) व श्री. संजय आत्राम (CRP) यांसह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

कार्यक्रमात महिलांचा, मुलांचा व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. या कार्यक्रमातून महिला सशक्तीकरण, आरोग्य, पोषण, शेती विकास व सामाजिक समानतेचा संदेश प्रभावीपणे गावकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा उत्सव उत्साहात व यशस्वीरीत्या साजरा करण्यात आला.

Previous Post

मन्नेराजाराम येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर संपन्न.

Next Post

सिरोंचा येथे जागतिक महिला दिनानिमित्त “महिलांचे मूलभूत अधिकार” विषयावर व्याख्यान.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
सिरोंचा येथे जागतिक महिला दिनानिमित्त “महिलांचे मूलभूत अधिकार” विषयावर व्याख्यान.

सिरोंचा येथे जागतिक महिला दिनानिमित्त “महिलांचे मूलभूत अधिकार” विषयावर व्याख्यान.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In