माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या जनसंपर्क कार्यालयात अभिवादन.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
*अहेरी:-* स्वातंत्र्य लढ्यातील शूर क्रांतिकारक आणि आदिवासी समाजाच्या अभिमानाचे प्रतीक असलेले शहीद वीर बाबुराव शेडमाके यांची जयंती अहेरी येथे उत्साहात साजरी करण्यात आली. माजी राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या जनसंपर्क कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.
या प्रसंगी वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील अद्वितीय शौर्य आणि त्यागाची आठवण करून देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. ब्रिटिश सत्तेविरोधात धैर्याने लढा देत आदिवासी समाजाच्या स्वाभिमानासाठी त्यांनी दिलेले बलिदान इतिहासात अजरामर असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी वीर बाबुराव शेडमाके यांच्या विचारांवर चालत समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांच्या बलिदानातून देशभक्ती, स्वाभिमान आणि संघर्षाची प्रेरणा मिळते, असेही यावेळी सांगण्यात आले.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मद्दीवार, भाजप तालुका अध्यक्ष विकास तोडसाम, प्रशांत कुत्तरमारे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष,अमोल गुडेल्लीवार नगरसेवक,मुकेश नामेवार,पंकज नौनूरवार, पराग आईलावार,दिलीप पडगेलवार,हर्षित करपेत,अजय ठाकरे,संजय तिम्मा,श्रीनिवास मगडीवार, निखिल बोम्मावार,सौ.शालिनीताई पोहनेकर नगरसेविका, सौ.ममताताई उईके,सौ.पद्माताई सडमेक, सौ.अनिताताई मडावी,यांच्यासह नागरिक उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी वीर बाबुराव शेडमाके यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करत त्यांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली.!
कार्यक्रमामुळे अहेरी परिसरात देशभक्तीचे आणि आदिवासी अस्मितेचे वातावरण निर्माण झाले होते.

