समाज सभागृहाचा भूमिपूजन सोहळाही संपन्न.
मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
तिमरम (गुड्डीगुडम )येथील आझाद क्रिकेट क्लब तर्फे आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी *माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर* ) यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली. याच वेळी गावातील समाज सभागृहाच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळाही मोठया उत्साहात पार पाडले.
ग्रामीण भागातील युवकांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या भाग्यश्रीताई आत्राम यांच्या उपस्थितीमुळे परिसरातील युवकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला. उद्घाटनावेळी खेळाडू, युवक व ग्रामस्थांनी त्यांचे जल्लोषात स्वागत करत त्यांच्याप्रती असलेला विश्वास आणि आदर व्यक्त केला.
यावेळी मार्गदर्शन करताना भाग्यश्रीताई आत्राम यांनी सांगितले की, क्रीडा क्षेत्रात युवकांना शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित करण्याची मोठी संधी देते. ग्रामीण भागातील युवकांमध्ये प्रचंड क्षमता असून योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळाल्यास ते मोठे यश संपादन करू शकतात. युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा क्रीडा स्पर्धांचे आयोजन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी प्रमुख उपस्थितीत अमोलभाऊ मुक्कावार (नगरसेवक, अहेरी), प्रफुलजी नागुलवार (उपसरपंच, तिमरम), तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, सल्लायाजी कंबलवार, उमेशजी पेंड्याला, संदीपजी सिडाम, अमोलजी रामटेके, सुमितजी मोतकुलवार, प्रफुलभाऊ पेंदाम, रुपेशभाऊ पेंदाम, विनयभाऊ कोतकोंडावार, तुषारभाऊ बोगामी, कोमलताई बोगामी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी आझाद क्रिकेट क्लब, तिमरम तसेच स्थानिक युवकांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेमुळे संपूर्ण परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले असून मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून परिसरातील युवकांमध्ये *भाग्यश्रीताई आत्राम* यांच्या नेतृत्वाबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
