मुंबई करता सप्ताहात आता दोन दिवस ट्रेन उपलब्ध.
हनिशा दुधे चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनीधी मो.9764268694
बल्लारपुर : चंद्रपूर व विदर्भातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. रेल्वे मंत्रालयाने लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते बल्लारशाह दरम्यान नवीन एक्सप्रेस गाडी सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.
रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार, गाडी क्रमांक 20105/20106 लोकमान्य टिळक (T) – बल्लारशाह एक्सप्रेस साप्ताहिक स्वरूपात धावणार आहे. ही गाडी मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस) येथून *गुरुवारी* रात्री 21:45 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी 13:15 वाजता बल्लारशाह येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात बल्लारशाह येथून *शुक्रवारी* सकाळी 05:50 वाजता सुटून दुपारी 14:45 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
या गाडीला ठाणे, कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, *शेगाव* अकोला, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, हिंगणघाट, वरोरा आणि चंद्रपूर या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान, रेल्वे मंत्री व रेल्वे प्रशासनाचे आभार मानले असून, “या गाडीमुळे चंद्रपूर जिल्हा आणि आसपासच्या भागातील नागरिकांना मुंबईशी थेट, सोयीस्कर व जलद रेल्वे संपर्क मिळणार आहे,” असे सांगितले.
ही सेवा दिनांक 24 एप्रिल 2026 पासून सुरू करण्यात येणार असून, यामुळे प्रवास सुलभ होऊन व्यापारी, शैक्षणिक व वैद्यकीय कारणांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

