Tuesday, June 2, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

एटापल्ली पोलिसांची धडक कारवाई; अवैध दारूसह 14.90 लाखांचा मुद्देमाल जप्त.

Madhukar gongale by Madhukar gongale
April 20, 2026
in Uncategorized
0 0
0
एटापल्ली पोलिसांची धडक कारवाई; अवैध दारूसह 14.90 लाखांचा मुद्देमाल जप्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विश्वनाथ जांभूळकर
एटापल्ली तालुका प्रतिनिधी.
मो. नं. 9421856931.

एटापल्ली : गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी लागू असतानाही अवैधरित्या दारू विक्री व वाहतूक करण्याचे प्रकार सुरू असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेत कारवाईचा धडाका सुरू ठेवला असून, एटापल्ली पोलिसांनी केलेल्या धाडीत अवैध देशी-विदेशी दारूसह महिंद्रा थार वाहन असा एकूण 14 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी पोलीस ठाणे एटापल्ली येथील अधिकाऱ्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एका चारचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणात अवैध दारूची वाहतूक केली जाणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापळा रचून विविध मार्गांवर नाकाबंदी केली. दरम्यान, MH 32 AS 7099 क्रमांकाचे संशयित वाहन नारनूर-एटापल्ली मार्गे लांजी गावाकडे येताना आढळून आले.

पोलिसांनी वाहन अडवून तपासणी केली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारूचा साठा आढळला. यामध्ये ‘रॉकेट’ कंपनीच्या 29 सिलबंद पेट्या तसेच बिअरच्या पेट्यांचा समावेश असून, या दारूची अंदाजे किंमत 2 लाख 90 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. तसेच, दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले महिंद्रा थार वाहन (किंमत सुमारे 12 लाख रुपये) देखील जप्त करण्यात आले. अशा प्रकारे एकूण 14 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

या प्रकरणी आरोपी मयूर विजय बालमवार (रा. वॉर्ड क्र. 7, गडचिरोली) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कलम 65 (अ), 83 तसेच भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कोल्हे हे करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी कार्तिक मथुरिया, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी चेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक मचिंद्र नागरगोजे यांच्या नेतृत्वात एटापल्ली पोलीस पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

Previous Post

गडचिरोली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्यावर कारवाईची मागणी;

Next Post

दुर्गम भागात लॉयड्स मेटल्स आरोग्यसेवेची क्रांती : हेडरीतील लॉयड्स काली अम्माल रुग्णालयात वेदनारहित प्रसूतीचा यशस्वी प्रयोग, ४०० सुरक्षित जन्मांचा टप्पा पूर्ण.

Madhukar gongale

Madhukar gongale

Next Post
दुर्गम भागात लॉयड्स मेटल्स आरोग्यसेवेची क्रांती : हेडरीतील लॉयड्स काली अम्माल रुग्णालयात वेदनारहित प्रसूतीचा यशस्वी प्रयोग, ४०० सुरक्षित जन्मांचा टप्पा पूर्ण.

दुर्गम भागात लॉयड्स मेटल्स आरोग्यसेवेची क्रांती : हेडरीतील लॉयड्स काली अम्माल रुग्णालयात वेदनारहित प्रसूतीचा यशस्वी प्रयोग, ४०० सुरक्षित जन्मांचा टप्पा पूर्ण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In