मधुकर गोंगले, उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
**गडचिरोली पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय भाऊ निखारे**यांच्या ज्येष्ठ कन्येचा विवाह नागपूर येथे अतिशय शाही व दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने तसेच आधुनिक व्यवस्थेसह पार पडला. आकर्षक सजावट, उत्तम नियोजन आणि मंगलमय वातावरणामुळे संपूर्ण कार्यक्रमाला विशेष शोभा प्राप्त झाली. उपस्थितांनी नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
या आनंददायी प्रसंगी शाहीन भाभी हकीम तसेच बबलू भैय्या हकीम यांनी विशेष उपस्थिती लावून वर-वधूस भेटवस्तू प्रदान केल्या व त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी मनःपूर्वक शुभाशीर्वाद दिले.
विवाह सोहळ्याच्या निमित्ताने निखारे कुटुंबीयांनी उपस्थित पाहुण्यांचे आदरातिथ्य उत्तम प्रकारे केले. सर्व उपस्थितांनी कार्यक्रमाचे कौतुक करत नवदांपत्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
